डिफेन्स अकॅडमी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तर्फे आयोजित समर कॅम्प मध्ये १६० विद्यार्थ्यांचा सहभाग

डिफेन्स अकॅडमी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तर्फे आयोजित समर कॅम्प मध्ये १६० विद्यार्थ्यांचा सहभाग अलिबाग/प्रतिनिधी सदर स्वसंरक्षण व आत्मनिर्भरता शिबिरात मुलांच्या शारीरिक व मानसिक विकास योगा मेडिटेशन श्रमसंस्कार इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी मा. बसवराज गोवे यांनी सैन्यभरती संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच निवृत्ती पोलिस इन्स्पेक्टर श्री. सुभाष म्हामुनकर यांनी तरुण मुलांना पोलिस भरती संधर्भात मार्गदर्शन केले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी मा. रवींद्र नाईक यांनी मुलांना क्रीडा क्षेत्रातील संधी याबाबत मार्गदर्शन केले तसेच अलिबाग पोलीस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक माननीय देशमुख मॅडम व इतर पोलिस अधिकारी यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली तसेच सैन्य दलात कार्यान्वित असलेले रतिश गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना कमांडो ट्रेनिंग संधर्भात मार्गदर्शन केले व प्रत्याशिके घेतली, तरी सदर शिबिराचा हेतू स्पष्ट करताना डिफेन्स अकॅडमी संस्थापक सचिव मा. समरेश शेळके यांनी सांगितले की, आज...