Skip to main content

Posts

Featured

आवाज कोकणचा /  नवी मुंबई   पत्रकार उत्कर्ष समितीच्या कर्मठ व निर्भीड शिलेदारांचा गौरव पनवेल /  अशोक म्हात्रे मुंबई येथे आर्यारवी इंटरटेनमेंट आयोजित प्रथम पुरस्कार सोहळ्यात  पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकारांच्या समितीचे कर्मठ व निर्भीड शिलेदार रायगड लोकधाराचे संपादक  श्री. विजय चंद्रकांत गायकर ( निर्भीड पत्रकार पुरस्कार ), आवाज कोकणचा चे संपादक डॉ. वैभव पाटील ( अजेय लेखणी पुरस्कार), आई न्यूज चैनल चे संपादक प्रा. श्री. अक्षय प्रभावती जनार्दन पाटील ( स्वाभिमान लेखणी पुरस्कार ), आम्ही पनवेलकर च्या संपादिका सौ. शितल कैलास मढवी ( अजेय लेखणी पुरस्कार ) अशा विविध पुरस्कारांनी या महारथींना सन्मानित करण्यात आले.  पत्रकारिता करतानाच समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडत समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव आपल्या लेखणीतून बाजू मांडून आपले कार्य करत असतात.  अशा या बहुमोल रत्नांचा झालेला हा सन्मान त्यांच्या कार्याची पोचपावती असून त्यांच्यावर विविध खरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.    

Latest posts