आवाज कोकणचा / पुणे
लोणावळा / अशोक म्हात्रे
आई एकविरा भक्तांना टोल माफी - एकविरा भक्त जयेंद्र दादा खुणे यांच्या प्रयत्नांना यश
श्री एकविरा चैत्र यात्रानिमित्त पालखी प्रमुख व स्वयंसेवकांची नियोजन बैठक संपन्न..
_____________________
श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट आयोजित चैत्र सप्तमी गुरुवार दिनांक ३ एप्रिल ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत देवींची यात्रा असून दिनांक ४ एप्रिल २०१४ रोजी देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न होणार आहे.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आई एकविरा देवीची महती जगविख्यात असून आगरी, कोळी, सिकेपी व इतर समाजाची एकविरा देवी कुलस्वामिनी आहे . पालखीला व यात्रेला दरवर्षी लाखो भक्त भाविक दर्शनासाठी येत असतात . श्री एकविरा देवीची यात्रा व पालखी सोहळा निमित्त चैत्र सप्तमी यात्रा व पालखीचे औचित्य साधून श्री. किशोर धुमाळ ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक ) यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. जयेंद्रदादा खुणे ( अध्यक्ष श्री एकविरा देवी भक्त भाविक मंडळ, महाराष्ट्र राज्य ) यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी प्रमुख व स्वयंसेवकांची नियोजन बैठक लोणावळा पोलीस ठाणे येथे संपन्न झाली.
या बैठकीमध्ये श्री. किशोर धुमाळ साहेब यांनी पालखी प्रमुख व स्वयंसेवकांना कामाचे नियोजम व माहिती देऊन भक्त भाविक व पायी पालखी पदयात्रेकरुंना सहज, सुलभरीत्या व व्यवस्थित दर्शन व्हावे , यात्रेत भांडणे,तंटा अथवा घटना होऊ नये , पिण्याच्या पाण्याची सोय, पुणे ग्रामीण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केल्याने आदेशाचे पालन करावे. याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. जयेंद्रदादा खुणे यांच्या सह नितीन कदम ( गोपनीय अंमलदार ), सतीश कुदळे ( पोलीस काँस्टेबल ), संतोष वाडेकर ( पोलीस काँस्टेबल ), विशाल डवले, प्रतीक साळुंखे,किरण गवळी,निलेश म्हात्रे,गणेश सावंत,महेंद्र भोईर, रवी भोईर,संगम चवरकर,हेमंत पाटील,वैभव पाटील इत्यादी बहुसंख्य प्रतिनिधी उपस्थित
होते.
मा.जिल्हाधिकारी पुणे यांचे प्रतिबंधात्मक आदेश
_______________________
श्री एकविरा देवी चैत्री यात्रा उत्सव २०२५ अनुषंगाने मा. श्री. जितेंद्र डुडी ( जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, पुणे ) यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये श्री एकविरा देवी गडावर दरवर्षीप्रमाणे चैत्री यात्रा, पालखी व उत्सव अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. ३०/०४/२०२५ चे ००:०० वा. पासून ते दि. ०६/०४/२०२५ चे १२:०० वाजेपर्यंत पुढील बाबी करण्यास प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. वरील काळात खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशाने मनाई आहे.
१) शोभेची दारु, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके वाजवणे
२) वादके, ढोल, ताशे वाजविण्यास व गडावर नेण्यास बंदी आहे.
३) एकाच प्रकारची व रंगाची कपडे / वेशभूषा परिधान करणे, विशेषतः टी शर्ट वापरणे
४) कोंबडे , बकरे, पशु, पक्षी यांचा बळी न देणे व त्यांना मंदिरावर न सोडणे
५) कार्ला लेणी व परिसरातील ऐतिहासिक वास्तू व शिल्पांना हानी न पोहोचविणे अथवा विद्रुपीकरण न करणे
वरील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.द.वि.सं. कलम १८८ मधील तरतुदी व प्रमाणित कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील.
एकविरा भक्तांना टोल माफीसाठी जयेंद्रदादा खुणे यांचे विशेष योगदान
--------------------------------------
श्री एकविरा आई भक्त भाविक मंडळ महाराष्ट्र राज्य व आगरी समाज नेते श्री. जयेंद्रदादा खुणे यांचे कार्ला गडावरील एकविरा यात्रा उत्सव काळात अथवा कोणत्याही कार्यक्रमात गेली अनेक वर्षे निस्वार्थी सेवा करिता असतात. सालाबादप्रमाणे यावर्षीही यात्रेनिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी व महाराष्ट्रातील इतर ठिकाणासह कोकणपट्टीतील मूळ रहिवाशी, भूमिपुत्र व समुद्र किनारपट्टीतील राहणारा समाज घाटमाथा चढून एकविरा देवीच्या असंख्य पालख्या घेऊन लाखो भक्त भाविक दर्शनाला येत असतात. आगरी, कोळी, कराडी, सिकेपी, कुणबी व इतर समाजाची कुलस्वामिनी श्री एकविरा देवीच्या यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व भाविकांना टोल वसुलीचा आर्थिक भुर्दंड होऊ नये यासाठी यात्रा कालावधीत शेडुंग, खालापूर, वरसोली, वाकसई, कुसगाव येथील टोल माफ व्हावा म्हणून. जयेंद्रदादा खुणे यांनी मा. श्री. वीरेंद्रजी म्हैस्करसाहेब (अध्यक्ष, आय.आर.बी. इन्फ्रा.), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सर्वच टोल प्लाझाला लेखी निवेदने दिलेली आहेत. एकविरा यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोलवर टोल घेणार नाही व सहकार्य केले जाईल असे टोल अधिकाऱ्यांनी सांगितले. यात्रेला जाणाऱ्या वाहनांना श्री एकविरा भक्त भाविक मंडळाचे अध्यक्ष श्री. जयेंद्रदादा खुणे यांच्याकडून गाडीला लावण्यास स्टिकर दिले जाणार असुन स्टिकर असलेल्या वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही. जयेंद्रदादा खुणे यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरावरील भक्तांकडून आभार व अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
यात्रेनिमित्त जड, अवजड व मोठी वाहनांना वाहतूक मार्गामध्ये बदल
_______________________
चैत्री यात्रा उत्सव २०२५ निमित्त
१) दि. ०४/०४/२०२५ रोजीचे दरम्यान कार्ला फाटा ते श्री एकविरा पायथा मंदिर दरम्यान पूर्ण वेळ अवजड व मोठ्या वाहनांना नो एन्ट्री ( प्रवेश निशिद्ध ) करण्यात आला आहे.
२) दि. ०४/०४/२०२५ असे ००:०१ ते २४:०० चे दरम्यान जुना मुंबई _ पुणे व पुणे - मुंबई हायवे रोडवर कुसगाव बुद्रुक टोलनाका, लोणावळा ते वडगाव फाटा, वडगाव ते मावळ असे अवजड व मोठ्या वाहनांना नो एन्ट्री ( प्रवेश निशिद्ध ) घोषित करण्यात आला आहे.
३) जुना मुंबई - पुणे हायवे वरून पुणे बाजूकडे जाणारी जड - अवजड व मोठी वाहने यांना लोणावळा येथील कुसगाव बु. टोलनाका मार्गे एक्सप्रेस हायवेने उर्से टोलनाक्यामार्गे पुणे शहराकडे जाणेसाठी वळविण्यात येत आहेत
४) पुणे - मुंबई कडे जाणारी जड - अवजड व मोठी वाहने हे वडगाव येथील तळेगाव फाटा येथून उर्से खिंडीतूम मुंबईकडे जाणेसाठी द्रूतगती महामार्गाचा वापर करावा
Comments
Post a Comment