आवाज कोकणचा / नवी मुंबई 

८ वर्षांच्या नक्ष राहुल पडतेचा ऐतिहासिक पराक्रम! घारापुरी ते गेटवे ऑफ इंडिया १२ किमीचे अंतर ४ तास ४३ मिनिटांत पार...

पूजा चव्हाण - उरण

उरण तालुक्यातील तडफदार जलतरणपटू नक्ष राहुल पडते यांनी केवळ ८ वर्षांच्या अतिशय लहान वयात अरबी समुद्रात अभूतपूर्व असा पराक्रम करत नवा इतिहास रचला आहे. नक्षने आपल्या आजोबांचे गाव घारापुरी बेट (Elephanta) येथून गेटवे ऑफ इंडिया पर्यंतचे तब्बल १२ किलोमीटर अंतर अवघ्या ४ तास ४३ मिनिटांत पूर्ण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

रात्री ४.२७ वाजता घारापुरी जेटीवरून उडी घेत नक्षने गडद अंधार, समुद्रातील लाटा आणि थंड पाण्याला सामोरे जात ही मोहीम यशस्वी केली. प्रचंड चिकाटी, सहनशक्ती आणि धैर्याच्या जोरावर या बाल जलतरणपटूने समुद्राला अक्षरशः छेद दिला.


या मोहिमेत नक्षचे आई सुकन्या राहुल पडते आणि वडील राहुल कमलाकर पडते  हे भारतीय नौसेना दलात ( nsod dockyard )येथे कार्यरत असून सर्वं पडते परिवार , तसेच डोंगर आळी ग्रामस्थ मंडळ यांनी मोठे प्रोत्साहन दिले. त्याला अनुभवी प्रशिक्षक संतोष पाटील, आणि त्यांचा गट जयेश अशोक पाटील, राज संतोष पाटील, साई संतोष पाटील आणि हितेश भोईर यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण प्रवासावर पर्यावेक्षक विनय शहा यांनी देखरेख केली.

नक्षच्या या कर्तृत्वामुळे त्याच्यासमोर इंग्लिश चॅनेल सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आव्हानांचे दरवाजे आता खुले झाले आहेत. उरण तालुक्यातील अनेक तरुण जलतरणपटूंना या कामगिरीने प्रेरणा मिळाली आहे.

या कार्यक्रमाला माजी सरपंच आशिष तांबोळी आणि माजी सरपंच दीपेश कोळी प्रमुख उपस्थित होते. सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कूलनेही नक्षला संपूर्ण पाठींबा दिला.

Comments

Popular Posts