आवाज कोकणचा / अशोक म्हात्रे
दिनाक 24 जानेवारी 22
महीला उत्कर्ष समिती कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग तर्फे रक्तदान करण्याचे तालुका अध्यक्ष दिपा ताटे यांचे आवाहन
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ तालुका अध्यक्ष माननीय दीपा ताटे यांच्या पुढाकाराने कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या कोरोना ची परिस्थिती हळूहळू सामान्य होत असली तरीही मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे. याकरिता मानव सेवेच्या दृष्टिकोनातून कुडाळ तालुका अध्यक्ष माननीय सौ. दिपा ताटे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष माननीय सौ. ज्योतिका हरयान , माननीय सौ. नेहा परब , माननिय सौ. सुप्रिया वालावलकर , माननिय सौ. तन्वी सावंत यांनी पुढाकार घेत शासकीय जिल्हा रुग्णालय सिंधुदूर्ग यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे .
जिल्ह्यातील सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण रक्तदान करून मानवसेवे प्रती आपले योगदान द्यावे.याकरिता समितीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करून नाव नोंदविण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment