दिनांक: 6 जानेवारी 22

पत्रकार उत्कर्ष समिती च्या वतीने उरण येथील विश्रामगृहात पत्रकार दिन उत्साहात साजरा



 

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती सोहळा अर्थात पत्रकारदिन  शासकीय विश्रामगृह उरण येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.

 दीप प्रज्वलन महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष  डॉ. स्मिता पाटील, रायगड अध्यक्षा रेखा घरत, उरण अध्यक्षा निर्मला पाटील, सीमा घरत , आवाज कोकणचा कार्यकारी संपादक आरती पाटील या पंचज्योतीच्या हस्ते झाली. यानंतर गणेश वंदन गीत अलंकार भोईर यांनी सादर केले. यानंतर प्रस्तावना पत्रकार उत्कर्ष समितीचे कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी केली. यावेळी त्यांनी समितीच्या सामाजिक कार्य, पत्रकारांसाठी सामाजिक कार्य, त्यांना विमा संरक्षण, गरजू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत आणि यापुढील कार्याचे उद्दिष्ट सांगितले. पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनीही आपल्या कार्याचे वेगवेगळ्या स्तरावरची माहिती दिली. पत्रकारांवर होणारे अन्याय, समाजामध्ये होणारे अन्याय, महिलांवर होणारे अन्याय, यांना वाचा फोडता यावी यासाठी महिला पत्रकार उत्कर्ष समिती स्थापन करून डॉ. स्मिता पाटील ह्या अध्यक्षपदाचे काम पाहत असल्याचे सांगितले. आणि या समितीद्वारे महिलांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध दाद मागितली जात असल्याचे सांगितले.

यावेळी उरण पत्रकार  संघाचे पत्रकार आणि पदाधिकारी उपस्थित राहिले. उरण पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संजय गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये पत्रकारिता हे एकनिष्ठ असली पाहिजे ती अन्यायाला वाचा फोडणारी असली पाहिजे असे मत व्यक्त केले. पत्रकार समितीचे कार्य पाहून त्यांनी आम्ही उरण पत्रकार संघ पत्रकार उत्कर्ष समितीच्या सोबत खांद्याला-खांदा लावून काम करण्याचे वचन दिले. तसेच टीव्ही वन इंडिया चे संपादक सुधीर शर्माजी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तेव्हा पत्रकारिता इमानदारीने स्वच्छ केली.  पाहिजे असे मत व्यक्त केले. यानंतर आवाज कोकांचा या साप्ताहिकाच्या वर्धापन दिनानिमित्ताने अंकाचे प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, कार्याध्यक्ष संजय गायकवाड, वरिष्ठ पत्रकार अजित पाटील, विरेश मोखडकर, पूजा चव्हाण, अशोक घरत, आदित्य वाघ, आशिष पाटील, अनंत नारांगिकर, पत्रकार उत्कर्ष समितीचे उपस्थित होते. तर पत्रकार उत्कर्ष समितीच्यावतीने अध्यक्ष- अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, कार्याध्यक्ष -अविनाश म्हात्रे, खजिनदार -शैलेश ठाकूर, लालचंद यादव,कोंकण अध्यक्ष- अलंकार , आणि रायगड संघटक-विश्वनाथ गायकवाड या सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ गायकवाड यांनी केले.

आभार प्रदर्शन डॉ. वैभव पाटील यांनी केले.

पुणे येथे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम जाधव, गणेश कांबळे , सातारा येथे दत्ता इनादार, उस्मानाबाद येथे अझीम काझी , अकोला येथे सतीश देशमुख, वाशिम येथे रमेश देशमुख, यवतमाळ येथे मनीष खर्च, सांगली येथे रोहित पाटील , मुंबई येथे पंकज पाटील या सर्वांनी आपापल्या सहकाऱ्यांसह मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला.

Comments

Popular posts from this blog