प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त उरण मध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न.


उरण दि 19(विठ्ठल  ममताबादे )
जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट संस्था पनवेल व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था उरण यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. केअर ऑफ नेचर रॉक ऍनिमल पार्क वेश्वि एकविरा डोंगर येथे प्राण्याच्या पुतळ्यांचे उदघाटन, रानसई येथे दोन रुग्णवाहिकेचे लोकार्पण, आय लव्ह रानसई नावाचे लोकार्पण,150 आदिवासी लोकांना ई श्रम कार्ड पॉलिसी वाटप, आदिवासी आश्रम शाळा चिरनेर येथे आदिवासी मुलांना मोफत कराटे क्लासेसची सुरवात आदि विविध सामाजिक उपक्रम विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त उरणमध्ये राबविण्यात आले. यावेळी उद्योजक महेश मारुतीराव पवार व महिला सामाजिक कार्यकर्ते संगीता सचिन ढेरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा रायगड भूषण राजू मुंबईकर,डाबर कंपनीचे मॅनेजर रमेश मारुतीराव पवार,श्री समर्थकृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या संस्थापक  संगिताताई ढेरे, ज्ञानेश्वरदादा घरत ( विद्यमान रा.जि.प.सदस्य ),अनंताशेठ म्हात्रे(सामाजिक कार्यकर्ते पनवेल), भारतदादा भोपी( उपाध्यक्ष - आगरी,कोळी,कराडी सं.संस्था ), नारायण माने(सामाजिक कार्यकर्ते मुंबई ),प्रदीपदादा पाटील(नेरे विभाग अध्यक्ष - आगरी,कोळी,कराडी सं.संस्था) ,झाकीरदादा काकर व श्याम लेंडे( सामाजिक कार्यकर्ते रानसई), विलास ठाकूर (सेक्रेटरी कॉन ), अनिल घरत(उरण तालुका सचिव- आगरी,कोळी,कराडी सं संस्था),सुनील वर्तक (अध्यक्ष गोवठने विकास मंच ),हिराचंद म्हात्रे (उपाध्यक्ष -गोल्डन ज्युबली मित्र मंडळ ), देवीदास पाटील( कार्याध्यक्ष गोल्डन ज्युबली मंडळ),जितेंद्र म्हात्रे( गोल्डन ज्युबली मंडळ),नितेश मुंबईकर , संपेश पाटील ( अध्यक्ष - मित्र परिवार),रोशन पाटील ( उपाध्यक्ष मित्र परिवार), क्रांती म्हात्रे ( कार्याध्यक्ष मित्र परिवार),गोपाळ म्हात्रे ( आंतरराष्ट्रीय कराटे कोच ),  समाधान पाटील (समाज कार्यकर्ते पिरकोन ),कु.केतन म्हात्रे,रानसई प्राथमिक शालेच्या शिक्षिका कडू मॅडम,ठाकूर मॅडम, मदतनिस कु.कविता आणि  रानसई येथील आठ आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधव ,महिला भगिनीं, विद्यार्थीवर्ग यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा वाढदिवस उरण तालुक्यात अनोख्या पद्धतीने  मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित, सुनील वर्तक यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेश्वि, गोल्डन जुबली मित्र मंडळ, मित्र परिवारचे पदाधिकारी सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.

Comments

Popular Posts