आवाज कोकणचा / नवी मुंबई
दि. 22 जानेवारी 22 / अशोक म्हात्रे
➖➖➖➖➖➖➖➖➖
‘संत रोहिदास समाज भूषण पुरस्कार – २०२२ करिता प्रस्ताव सदर करण्याचे आवाहन
बृहन्मुंबई महानगरपालिका व संत शिरोमणी रोहिदास समन्वय समितीचे ‘’संत रोहिदास समाज भूषण पुरस्कार – २०२२ करिता प्रस्ताव सदर करण्याचे आवाहन.
मुंबई, शुक्रवार : जागतिक कीर्तीचे मानवतेचा संदेश देणारे विज्ञानवादी विचारांचे संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज यांच्या ६४६ व्या जयंती निमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या ‘’संत रोहिदास समाजभूषण पुरस्कार – २०२२ ‘’ करिता चर्मकार समाजबांधवांकडून माहितीसह प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका व संत शिरोमणी रोहिदास समन्वय समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या संत रोहिदास जयंती सोहळ्यात मान्यवरांच्या शुभहस्ते समाजातील १० व्यक्तींना त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, क्रिडा, आर्थिक विकास तसेच चर्मकारांच्या उन्नती करिता झटलेल्या समाजबांधवाच्या कार्याचा गौरव करीता त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह असे आहे. हा पुरस्कार संत रोहिदास महाराजांच्या ६४६ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. तरी समाजातील बांधवांनी आपल्या अर्जरूपी प्रस्तावात दोन फोटो, आधारकार्ड, पॅन कार्ड किंवा ओळखपत्र, कार्याचा अहवाल, गुन्हेगार नसल्याचे प्रतिज्ञापत्र, दोन नोंदणीकृत संघटनांचे शिफारस पत्र, संघटना नोंदणी पत्र अर्जासाहित मा. जनसंपर्क अधिकारी, महापौर कार्यालय, पहिला मजला मुख्य इमारत, मुंबई महानगर पालिका, फोर्ट, मुंबई-०१ यांचेकडे शुक्रवार दि. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सायं.४.३० वाजेपर्यंत सुपूर्द करावा. अर्जदार हा चर्मकार समाजाचा असावा व त्याचे वय ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ५० वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तसेच पुरस्काराकरिता काही निकष ठरविण्यात आलेले आहेत. त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरीता समिती अध्यक्ष श्री. सुर्यकांत आंबेकर ७०२१८११४६२, सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे ९८२०१५८८८५, उपाध्यक्ष श्री. राजेश खाडे ९८२१६५५५७८, खजिनदार श्री. जगन्नाथ वाघमारे ९८२००३४३६८ यांच्याशी संपर्क साधावा. असे संत शिरोमणी रोहीदास समन्वय समितीचे सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
Comments
Post a Comment