तंबाखू मुक्त शाळा अभियानात उरण तालुक्यातून पहिली तंबाखू मुक्त शाळा म्हणुन रा.जि. प.प्राथ.शाळा मोठीजुई शाळेला मिळाला बहुमान...
22 जानेवारी /अशोक म्हात्रे
तंबाखू मुक्त शाळा अभियान अंतर्गत पंचायत समिती उरण शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन व आसान सेवाभावी सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यशाळेत महाराष्ट्र शासनाच्या 10 फेब्रुवारी 2021 च्या निर्णयानुसार तंबाखूमुक्त शाळेसाठी नवीन निकष सांगण्यात आले होते. ते निकष कसे अपलोड करावेत, कोण कोणते उपक्रम राबवावेत यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यानुसार उरण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री अंजने साहेब,सर्व अधिकारी वर्ग, सलाम मुंबई जिल्हा समन्वयक श्री संदेश देवरूखकर सर, प्रकल्प समन्वयक श्री.आदेश नांदवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मोठीजुई या शाळेने विविध उपक्रम राबवून तसेच तंबाखू मुक्त शाळा, परिसर, गाव व घर कसे करता येईल तंबाखूचे दुष्परिणाम, याबाबतचे मार्गदर्शन, तंबाखू मुक्तीची शपथ, १०० यार्ड परिसरातील सर्व दुकानदारांना तंबाखूजन्य पदार्थ न  विकण्याचे निवेदन देऊन शासनाचे नऊ निकष पूर्ण करून उरण तालुक्यातून *तंबाखूमुक्त शाळा* म्हणून पहिला येण्याचा बहुमान मिळविला आहे त्यामुळे विविध स्तरातून शाळेचेअभिनंदन होत आहे. या मोहिमेसाठी सहकार्य करणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत मोठीजुईच्या विद्यमान सरपंच सौ ललिताताई पाटील व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम भोईर, उपाध्यक्षा सौ.  तृप्ती ताई बंडा व सर्व सदस्य, शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. संजय होळकर सर, सौ रंजना म्हात्रे मॅडम,  श्री दर्शन पाटील सर, श्री संदीप गावंड सर, शर्मिला पाटील मॅडम, श्री यतीन म्हात्रे सर, श्रीमती ज्योती बामणकर मॅडम, सर्व विद्यार्थी वर्ग, पालक यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुभाष म्हात्रे सर यांनी आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog