आवाज कोकणचा / कोकण प्रतिनिधी
दिनांक 15 फेब्रुवारी 22
➖➖➖➖➖➖➖➖➖
महिला उत्कर्ष समिती कुडाळ तर्फे रक्तदान शिबिर संपन्न
..............................................
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती कुडाळ अध्यक्षा मा. सौ. दिपा ताटे यांच्या पुढाकाराने ओरोस रवळनाथ मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य व विभागातील अनेकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून शिबिर यशस्वी केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मा. सौ. ज्योतीका हरयान , मनीषा त्रिभुवने, नेहा परब, सुप्रिया वालावलकर, माधवी यादव, दीप्ती चव्हाण, मीनाक्षी कदम, स्वामींनी नाईक, रुपाली वरक, रश्मी गावडे, अनुष्का ओरोसकर, दिपा चव्हाण, जिल्हा सचिव मा. सौ. तन्वी सावंत यांनी अथक परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिराला सामाजिक कार्यकर्ते मा.सुशिल निब्रे, छोटू पारकर, ओरोस सरपंच प्रिती देसाई , उपसरपंच मनस्वी परब, आंबेगाव सरपंच वर्षा वरक, ग्रामपंचायत सदस्य अमित भोगले, हार्दिक शिगले, बचतगट प्रभागसंघ व्यवस्थापक राऊळ मॅडम यांनी भेटी देऊन सहकार्य केले.
आंबेगाव सरपंच वर्षा वरक, समितीच्या तन्वी सावंत,नेहा परब, रुपाली वरक,रश्मी गावडे यांनी रक्तदान करून सर्वांनी रक्तदान करावे यासाठी प्रोत्साहित केले.
या शिबिरासाठी जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.गोडबोले,अधिपरिचारिका प्रांजली परब, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते किशोर नांदगावकर, वाहनचालक नितिन गांवकर,वाहनमदतनीस सुरेश डोंगरे यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment