आवाज कोकणचा / अशोक म्हात्रे

दिनाक : 16 फेब्रुवारी 22

-------------------------------------------------

ओएनजीसी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑइल फिल्टर असोसिएशनचे उरण प्लांट समीर  साखळी उपोषण


 ३५ वर्षाहून अधिक काळ  एम, ओ, यू, कामगार ओएनजीसी मध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. संघटनेच्या वतीने श्री. शालिग्राम मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयातून कामगारांच्या बाजूने निकाल मिळवून दिला आहे परंतु ओएनजीसी प्रशासन या निकालाकडे कानाडोळा करत असून कामगारांची देणी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे येथील कामगारांचे म्हणने आहे. 

परिणामी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवामानाना होत असून कामगार बेहाल झाले आहेत याकडे लक्ष वेधण्यासाठी या कामगारांनी उरण ओएनजीसी प्लांट समोर तीन दिवसांचे लाक्षणिक साखळी उपोषण सुरू केले असून प्रशासनाने गांभीर्याने हा प्रश्न न सोडवल्यास सर्व कामगार आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबणार असून या काळात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्व जबाबदारी ओएनजीसी प्रशासनाची राहणार असल्याचे कामगारांचे म्हणने आहे.

त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या प्रश्नांचा निकाल लावून कामगारांचे प्रश्न सोडवण्याची मागणी सकल कामगार करत आहेत. 

   

Comments

Popular posts from this blog