आवाज कोकणचा / अशोक घरत
दिनांक 17 फेब्रुवारी 22
...............................................
पत्रकार उत्कर्ष समिती आणि आधार हॉस्पिटल पनवेल यांच्या सहकार्याने सोमटणे येथे आरोग्य शिबिर संपन्न
*****************************
पनवेल तालुक्यातील सोमटणे गावातील हनुमान मंदिर येथे पत्रकार उत्कर्ष समिती व आधार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन तालुका चिटणीस राजेश केणी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील, सदस्य अशोक घरत आधार हॉस्पिटल चे डॉ. मिलिंद पराडकर, डॉ. संतोष पांढरे, डॉ. शुभांगी यादव, परिचारिका शालिनी मिश्रा, मेघा मते, जनसंपर्क अधिकारी दिपक भोपी, उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य सुशांत जनार्दन पाटील यांची कन्या तेजश्री तिच्या ५ व्या वाढदिवसानिमित्त सोमटणे हनुमान मंदिर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळेस तेजश्रीला शुभेच्छा देत असताना राजेश केणी यांनी या कार्यक्रमातून समाजाने बोध घ्यावा अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या .
सध्या तरुणांमध्ये वाढदिवस म्हणजे फक्त सेलिब्रेशन ही भावना रुजलेली आहे .मात्र वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून समाजाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त कार्यक्रम राबवले तर चांगल्या विचारांची सक्षम पिढी निर्माण होण्यास मदत होईल.
या कार्यक्रमाला माननीय नामदेवशेठ फडके,राजेश केणी, जनार्दनशेठ पाटील, सुभाषशेठ भोपी , वामनशेट शेळके, शेखरजी शेळके , देवाभाई पाटील, बाळाराम फडके ,नरेंद्र भोपी, डिके भोपी , गजानन पाटील, सुधीर फडके, सोमटणे ग्रामस्थ ,ग्रामपंचायत सरपंच दीपक पाटील , उपसरपंच संजय डूके मा. उपसरंचप सिध्दी संजय पाटील मा.उपसरंचपच सुरेखा पदमाकर खारके मा.सदस्य संजय मधूकर पाटील नवनाथ मुंढे भालचंद्र गोरी सखाराम पाटील शंभो दिघे अजय भागित नितीन तांडेल जीवन मुंढे दीपक पाटील सचिन पाटील जितेंद्र पाटील पद्माकर खारके आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते
Comments
Post a Comment