आवाज कोकणचा / ठाणे
जान्हवी मालवदे (पत्रकार प्रतिनिधी-डोंबिवली)
दिनांक 20 फेब्रुवारी 22

जनकल्याण सेवा फाउंडेशन वतीने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात कार्यक्रम आयोजन

शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता जनकल्याण सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य वतीने शिवजन्मोत्सव 2022 सोहळा फार आनंदाने पार पडला. कार्यक्रम आयोजन जनकल्याण सेवा फाउंडेशन,उद्योग अंकुर बिजनेस फोरम, महिला शक्ती नारी प्रतिष्ठान,रोजगार विभाग यांच्या सयूंक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्र भर आयोजन करण्यात आले.रायगड,सिधुदुर्ग, मुंबई,कोल्हापूर,पुणे,सातारा अश्या अनेक राज्य मधून ऑनलाइन पदतीने घराघरात शिवजयंती कार्यक्रम नियोजन करण्यात आले.अनेक शिवप्रेमीक यांनी आपल्या घरात कुटुंब सोबत शिवप्रतिमा पूजन तसेच घरासमोर रांगोळी व एक झेंडा लावून शिवजन्मोत्सव साजरा केला.
डोंबिवली येथे छत्रपती शिवराय शिवस्मारक ला दिव्यांची आरास करण्यात आली.श्री सुधीर पवार साहेब यांच्या वतीने शिवजयंती महत्व,सौ जान्हवी मालवदे यांच्या वतीने सूत्रसंचालन व जनकल्याण सेवा फाउंडेशन माहिती,सौ सुलेखा गटकल यांच्या वतीने राजमाता जिजाऊ ,सौ स्वाती हिरवे यांच्या वतीने महिला शक्ती नारी प्रतिष्ठान,सौ सीमा पुकाळे यांच्या वतीने रोजगार विभाग,श्री विजय फळणे यांच्या वतीने संपूर्ण वार्षिक कार्यक्रम नियोजन,श्री सचिन फळणे यांच्या वतीने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात संकल्प,सौ संचिता फळणे यांच्या वतीने घरात बसून महिला काम करून आपला व्यवसाय व रोजगार कसा वाढु शकतो याची माहिती देण्यात आली.शिवजयंती पूजन जेष्ठ नागरिक यांच्या वतीने करण्यात आला.शिवजयंती आरती, पाळणा, गीत अनेक महिलांनी सुंदर रित्याने गायन केले.संपूर्ण परिसर दिव्यांची आरास करून उजळून टाकण्यात आला.आलेल्या शिवसेवकाना शिवजयंती कार्यक्रम राबवून सुंदर रित्या सहकार्य केल्याबद्दल आभार पत्र जनकल्याण सेवा फाउंडेशन अध्यक्ष श्री सचिन फळणे यांच्या वतीने करण्यात आले.अनेक महिला वर्ग यांचा जोरदार प्रतिसाद छान होता.श्री अभिजित मालवदे साहेब यांनी फाउंडेशन वतीने आलेल्या शिवप्रेमीक यांचे आभार मानून कार्यक्रम सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog