महिला उत्कर्ष समिती सोबत येण्याचे वैभववाडी तालुका अध्यक्ष सौ रश्मी रावराणे यांचे आवाहन
आवाज कोकणचा / नवी मुंबई
2 फेब्रुवारी / अशोक म्हात्रे
महिला उत्कर्ष समिती सोबत येण्याचे वैभववाडी तालुका अध्यक्ष रश्मी रावराणे यांचे आवाहन
-------------------------------------------
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या वैभववाडी तालुका अध्यक्ष माननीय सौ रश्मी रावराणे यांनी हळदी कुंकू च्या कार्यक्रमाचे शानदार आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी विभागातील सर्वच स्तरातील महिलांना एकत्र आणून त्यांचा यथोचित सत्कार केला तसेच महिला उत्कर्ष समितीच्या आतापर्यंतच्या कार्याबद्दलची विस्तृत माहिती उपस्थित महिलांना दिली आणि महिला उत्कर्ष समिती सोबत जोडले जाण्यासाठी आवाहन केले .
यावेळी प्रामुख्याने आयोजक रश्मी रावराणे यांच्यासह मीनाक्षी रावराणे, सुरेखा रावराणे, उमा सुतार, सरिता रावराणे, सुमित्रा साळुंखे, शीला रावराणे, श्रद्धा रावराणे व इतर महिला उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment