महिला उत्कर्ष समितीने सिंधुदूर्ग जिल्ह्यात जल्लोषात साजरा केला केला शिवजयंती उत्सव...!!

आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग

ज्योतीका हरयान (कणकवली)

दिनांक 19 फेब्रुवारी 22 

.................................................

महीला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे  शिवजयंती उत्साहात साजरी

................................................

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली, वैभववाडी, कुडाळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह रायगड मध्ये   महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव  थाटामाटात व उत्साहात साजरा केला. 

यावेळी समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मा. ज्योतीका हरयान, कुडाळ तालुका अध्यक्ष मा. दिपा ताटे, वैभववाडी तालुका अध्यक्ष मा. रश्मी रावराणे, कणकवली तालुका अध्यक्ष मा. शोभा पाष्टे, रायगड अध्यक्ष मा. रेखा घरत, उरण तालुका अध्यक्ष मा. निर्मला पाटील यांच्यासह समितीच्या इतर सदस्या व पदाधिकाऱ्यांनी आकर्षक रांगोळी काढून शिवरायांना मानाचा मुजरा केला.

या कार्यक्रमासाठी कणकवली येथे सिंधुदूर्ग जिल्हा  सचिव सुप्रिया पाटील,सदस्य नेहा कोळंबकर,स्वरदा खांडेकर,दुर्वा मानकर,सविता चव्हाण , माजी बालकल्याण सभापती रत्नप्रभा वळंजू, सदस्या अंकिता कोकाटे,दिप्ती बोभाटे, स्नेहा शेळके तर वैभववाडी येथे सदस्य मृण्मयी रावराणे,मिनाक्षी रावराणे, सुप्रिया रावराणे,अमृता रावराणे,मेघा धुलप,जयश्री यादृक,कोमल रावराणे,भक्ती रावराणे,तारामती सुतार यांच्यासह कुडाळ येथे सौ. तन्वी सावंत, मनीषा त्रिभुवने, नेहा परब, माधवी यादव, दिप्ती चव्हाण, लिनक्षी कदम, स्वामींनी नाईक, रुपाली वरक, रश्मी गावडे, अनुष्का ओरोसकर, दिपा चव्हाण उपस्थित होत्या.

या कार्यक्रम प्रसंगी महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश कार्याध्यक्षा मा. श्रुती उरणकर या विशेषतः उपस्थित राहिल्या म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी तर्फे  त्यांचा सत्कार करण्यात आला. 















Comments

Popular posts from this blog