छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोलखे पेठगावात उत्साहात साजरी*
*छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कोलखे पेठगावात उत्साहात साजरी*
आवाज कोकणचा/कोलखे प्रतिनिधी
कोळखे- पेठ येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात जाती- धर्म ,भेद विसरून एकत्रितपणे साजरे करण्यात आली. यावेळेस सोशल डिस्टंसिंग राखून ,ढोल- ताशा ,लेझीम पथक घेऊन मिरवणूक प्रथमच कोळखे -पेठ गावात काढण्यात आली. ही मिरवणूक मंजुळे नगरपासून वास्तू आनंद- वास्तू विहार, साईराज गोल्डनव्ह्यु, विठ्ठल रुक्माई मंदिर व मानसिक पार्क येथे जाऊन शिवाजी पुतल्यास मानवंदना देऊन समाप्त करण्यात आली या मिरवणुकीचे आयोजन मंजुळेनगर चे सभासद व मानसी पार्क येथील कार्यकर्ते रिक्षा चालक-मालक पेठगाव संघ या सर्व जण एकत्र येऊन साजरी करण्यात आली.
Comments
Post a Comment