*श्री संप्रदयाचे सचिनदादा धर्माधिकारी यांना युरोपियन विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी बहाल*
*श्री संप्रदयाचे सचिनदादा धर्माधिकारी यांना युरोपियन विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी बहाल
आवाज कोकणचा / वैभव पाटील
दिनाक 25 फेब्रुवारी 22.
जागतिक स्तरावर अध्यात्मिक व सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून समाज सेवेचा वारसा चालवणाऱ्या महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणारे रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांना शुक्रवारी (ता.२५) युरोपियन इंटरनॅशनल विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली.
या निमित्ताने श्री सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
धर्माधिकारी कुटुंबाने संपूर्ण जगात आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम केले आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने व्यसनमुक्तीसाठी भरीव कार्य केल्यामुळे अनेक तरुण व्यसनमुक्त झाले असून सन्मार्गाला लागून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. जिल्ह्यसह राज्यात स्वच्छता मोहिमेत प्रतिष्ठानच्या अतुलनीय सहभागामुळे स्वच्छ सुंदर रायगड जिल्हा ही संकल्पना यशस्वी होत आहे.
गणेशोत्सव काळात निर्माल्यापासून बचाव करत तलाव व विहिरीतील गाळ श्री सदस्यांच्या मदतीने काढण्याच्या मोहिमा दरवर्षी राबवल्या जातात.
प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेतून वनसंपदेत भर पडली आहे. याचबरोबर निसर्ग चक्रीवादळ, महाड पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये गरजूंना मदतीचा हात देण्याचे कार्य सचिनदादा धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे.
या संपूर्ण कार्यात पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी हे प्रतिष्ठानचे सर्व कार्य पाहत समाजाला नवचैतन्य व नवसंजीवनी देण्याचे काम निःस्वार्थपणाने करत आहेत.
या सर्व कार्याची दखल युरोपियन इंटरनॅशनल विद्यापीठाने घेवून सचिन दादा धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे.
धर्माधिकारी कुटुंबातील तिसऱ्या पिढीला ही मानद डॉक्टरेट मिळाली आहे.
जय सद्गुरू 🙏
ReplyDelete