आदरणीय श्री सचिनदादा धर्माधिकारी यांचा आज जन्मदिन
आदरणीय श्री सचिनदादा धर्माधिकारी यांचा आज जन्मदिन
आवाज कोकणचा संपादकीय लेख
"जन्मदिवसाच औडंबर नसावं तर या दिवशी गतवर्षी केलेल्या संकल्पांच्या सिद्धी पर्यंतचा प्रवास तपासावा व नविन संकल्प नियोजित करावे" अश्या परखड मताचे आदरणीय सचिनदादा स्वारी ...
तीर्थरूप आदरणीय डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ज्यांनी "श्रीमत दासबोधाच्या" निरुपणाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला जगण्याचं सामर्थ्य दिल .त्यांची परंपरा आदरणीय पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय श्री सचिनदादा धर्माधिकारी, अध्यात्मा सोबत समर्थ संप्रदायामध्ये श्रवणासोबत समाजकार्यातून नवपिढी निर्मितीचे सर्वश्रेष्ट्य कार्य करत आहेत.
केवळ श्रीमत दासबोधातील श्रवणातिलच न्हवे तर कर्तव्याच्या आणि समाज कार्यच्या भावनेतून प्रत्येक श्री सदस्या मध्ये अध्यात्मा बरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचे समाजकार्याचे श्री बिज रुजवून परिवर्तनाच काम दादांच्या मार्गदर्शनाने होत आहे.
आज संपूर्ण भारतात न्हवे तर 20 पेक्षा जास्त राष्ट्रामध्ये मध्ये समाजकार्यचा यज्ञ चालू आहे. केवळ दासबोधाच्या श्रवणातून आत्मवृद्धी बरोबरच समाजाच्या ऋणांचा देखिल शिक्षण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या मार्फत दिल जात आहे.
त्याचच प्रत्यंतर म्हणून आज 20 पेक्षा जास्त देशांमध्ये समजउपयोगी अश्या अनेक उपक्रमांची मालिका अखंड पणे चालू आहे. ज्या देशातील श्री समर्थ लाखो टन कचरा उचलून स्वछता करतात हजारो किलोमीटर चे रस्ते साफ होतात या कार्येक्रमाच्या नियोजनाचा फार मोठा भार असतो मग या मध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक श्री सदस्याची काळजी ,त्याला समाजकार्य करताना कुठेही इजा होणार नाही त्याकरता लागणारी प्रत्येक गोष्ट कशी उपलब्ध होईल याचा खोलवर विचार करुन त्या उपक्रमाची रचना श्री सचिनदादा स्वारी आणि धर्माधिकारी परिवार करीत आहेत .अहो रात्र दादांच्या परिश्रमांमुळेच विश्वाला अचंबित करणारे विश्वविक्रमी उपक्रम उभे राहिले आहे.
"समाजकार्य करणारे आपले श्री सदस्य आहेत आपण फक्त निम्मित आहोत आणि प्रत्येक श्री सदस्य धर्माधिकारी कुटुंबीय आहेत" अस सांगणारे आदरणीय श्री सचिनदादा खऱ्या अर्थाने "दिनाचा दयाळू मनाचा मवाळू "याचा प्रत्यय देतात .फार संयमी , काहीवेळा कठोर , आणि तितकेच परकोटीचे स्नेह प्रेम त्यांच्या ठाई दिसतो .
आदरणीय दादा स्वारींच्या नियोजना मुळेच अनेक अश्या पद्धतीचे सामाजिक जागतिक कीर्तीचे उपक्रम उभे राहिले आहेत आणि खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाच भान नविन पिढीला देण्याच काम ते करत आहेत.
स्वछता केलेलं हजारो किलोमीटर चे रस्ते असो त्या रस्त्यांच्या आजूबाजूला उभी राहणारी वनराई असो आणि त्याच बरोबर वृक्ष लागवडी नंतरच संवर्धन ही खऱ्या अर्थाने फ़क्त कागदावर नव्हे तर कृतीतुन समर्थ पणे उभे रहात आहे आणि त्या साठी लागणार खडतर नियोजन हे श्री सचिनदादा स्वारींच्या मार्दर्शनातून होत आहे .
आज श्री सदस्याच्या माध्यमातून श्रवणाला आलेला तरुण विद्ववतेच्या दृष्टीने कमी पडू नये म्हणून त्याला नविन येणाऱ्या JE किंवा CET सारख्या विद्ववतेच्या चाचण्यां मध्ये उपयुक्त मार्गदर्शन प्रशिक्षण असेल.
जे तरुण आपले महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करत आहेत त्यांच्या स्वयंरोजगाराच प्रशिक्षण असेल आणि तरुण पिढीला आवश्यक असणाऱ्या अनेक नविन विषयांचं मार्गदर्शन असेल ते पोचवण्यासाठी दिवस रात्र एक करून अनेक उपक्रम प्रत्यक्षात येत आहेत.
हजारो तरुणांना याचा लाभ होत आहे हजारो तरुणांची यादी स्वयं रोजगारात उभी राहिली आहे याचं श्रेय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या संकल्पात आहे.
आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम होतायत. आदरणीय सचिन दादांच्या माध्यमातून कॅन्सर झालेल्या रुग्णांना रोग बरा होण्या साठी दुसऱ्या व्यक्ती च्या शरीरातील आवश्यक पेशी उपलब्ध करून देण्याचा "पेशी देणगीदार यादि "देशातील पहिला प्रकल्प आदरणीय सचिन दादांच्या संकल्पनेतुन सुरू होऊन अनेक रुग्णांना त्याचा लाभ होत आहे.
येणाऱ्या काळात पाण्याची समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्रतील नवे तर देशातील अनेक तलाव ,विहिरी , नदया शुद्धीकरणाच काम श्री सदस्यांच्या माध्यमातून होत आहे .
अनेक घरात पाण्याच पुनर्भरण या विषयावर डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्टान यांच अतिशय सोप्प्या भाषेत असलेलं एक पानाचा माहिती पत्रक उपलब्ध होत आहे.
याची तयारी करताना सचिन दादांनी अनेक तज्ञा व्यक्तींचे सल्ले घेतले प्रत्यक्ष कृती करून लोकांमध्ये हे पोचवले. विद्यार्थ्यांन मार्फत घरच्या घरी रेन वॉटर फिल्टर बनवण्याच प्रशिक्षण देणार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे पाहिलं प्रतिष्ठान आहे. याचा खरोखर अभिमान आहे. आणि याची संपूर्ण संकल्पना सचिनदादांनी साकारलेली आहे.
संपुर्ण सोलापूर व महाराष्ट्रात दहा हजारा पेक्षा जास्त घरांमध्ये जलपुनर्भरणाचा कार्येक्रम राबवला जात आहे आणि त्याचे फायदे हे बोरिंग आणि विहीरीला असणाऱ्या वाढत्या पाण्याच्या पातळी वरून लक्षात येत आहेत.
पर्यावरणाच्या दृष्टीने कोणतेही उपक्रम असो मग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पन्नास हजार झाडांची लागवड असो. त्यामुळे तेथे हजारो हरणांची संख्या वाढल्याचं निदर्शनास आले आहे. त्या बद्दल वनखात्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
श्री सचिनदादा धर्माधिकारी ,श्री उमेश दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम उभे राहिले आहेत. त्याची माहिती देताना शब्द व् आंकड़े हि कमि पडतील .
कोणताही विषय संपूर्ण समजून घेऊन मगच आदरणीय सचिन स्वारी त्या विषयी मत व्यक्त करतात ,सर्वांनाच वारंवार दादांचा मार्गदर्शन प्राप्त होत असत त्या मुळेच सामाजिक असतिल व्यक्तिगत असतील अनेक श्री सदस्यांनाच न्हवे तर सामान्य माणसाला सुद्धा आपल्या जीवनातील अडचणीच्या काळात कोणता मार्ग स्वीकारला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर मिळत असत.
लोकांच्या जिवनात असलेली उदासीनता नष्ट करताना ज्या वेळेला कोणतीही व्यक्ती जेव्हा श्री सचिनदादां समोर जाऊन बसते तेव्हा त्याच्या घडलेल्या चूका किंवा येणाऱ्या काळात त्याच्या वागणुकीत करायचे आवश्यक बदल हे सचिन दादा अतिशय सहज पणे सांगतात आणि त्या मुळे नव पिढीत कुटुंब सौख्य भावना व राष्ट्रनिर्मतीची प्रेरणा निर्माण होत असते.
श्रवण मनन आणि निजध्यास या बरोबरच स्वकर्तुत्वाने सामाजिक परिवर्तना साठी समाज कार्याला जोडण्याच काम प्रत्येक मनामनात श्री सचिनदादा स्वारी करत असतात.
दादा स्वारींची मार्गदर्शन प्रेरणा त्यांनी दिलेली अध्यात्माला आधुनिक तंत्रज्ञानाची,समाजकार्याची जोड ही ही खऱ्या अर्थाने राष्ट्र तेज निर्माण करत आहे. आणि हेच राष्ट्रप्रेम प्रत्येक व्यक्तीच्या मनात रुजवण्याचा काम श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने होत आहे.
आज वाढदिवसाच्या निमित्ताने दादांचा हा स्नेह हे प्रेम आणि त्याचं असणार मार्गदर्शन आणि सामर्थ्य सर्व श्री सदस्यांना चिरकाल लाभत राहो हेच श्री सद्गुरू चरणी निवेदन करताना दादांनी आजवर केलेल्या कार्या समोर नतमस्तक होऊन साष्टांग नमस्कार .
जय सदगुरु !!!
🙏🙏🙏🙏
ReplyDelete