वैभववाडी मध्ये महिला उत्कर्ष समितीच्या तालुका अध्यक्ष मा. रश्मी रावराणे यांनी वृद्धाश्रमातील महिलांसोबत साजरा केला जागतिक महिला दिन

  आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग

८ मार्च / प्रतिनिधी.

वैभववाडी मध्ये महिला उत्कर्ष समितीच्या तालुका अध्यक्ष मा. रश्मी रावराणे यांनी वृद्धाश्रमातील महिलांसोबत साजरा केला जागतिक महिला दिन


८ मार्च हा जागतिक महिला दिन या दिवसाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुका अध्यक्ष रश्मी रावराणे यांनी विभागातील असहाय्य व वृद्धाश्रमात आपले जीवन व्यतीत करणाऱ्या  वृध्द महिलांसोबत हा दिवस साजरा करून त्यांच्या कंटाळवाण्या रटाळ झालेल्या आयुष्यात आनंदाचा एक क्षण आणण्याचे काम केले.

त्यांच्या या कार्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे  यावेळी बोलताना रावराणे म्हणल्या की या छोट्याश्या कृतीने आश्रमातील महिलांच्या चेहऱ्यावर आलेले आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा अशी सेवा करण्यास प्रवृत्त करतात  

यावेळी समितीच्या उपाध्यक्ष सुमित्रा साळुंखे, सदस्या संगीता रावराणे, वैष्णवी जठार, शर्मिन काझी, मीनाक्षी रावराणे व इतर सदस्या उपस्थित होत्या. 




Comments

Popular posts from this blog