जागतिक महिला दिनी  महिला उत्कर्ष समिती सिंधुदूर्गने  अनाथांना दिले आनंदाचे क्षण....

 आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग

८ मार्च / ज्योतीका हरयान

----------------------------------------------

जागतिक महिला दिनी  महिला उत्कर्ष समिती सिंधुदूर्गने  अनाथांना दिले आनंदाचे क्षण....


----------------------------------------------

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षा मा. सौ. ज्योतिका हरयान  यांच्या संकल्पनेतून व जीवनआनंद  संस्था संचलित संविता आश्रम पणदूर येथिल  अनाथाश्रमातील महिलांची व शाळकरी मुलींची भेट घेवून त्यांना मदतीचा हात पुढे केला. 

जागतिक महिला दिन हा केवळ औपचारिकता म्हणून साजरा न करता  एक वेगळा आदर्श समाजापुढे गेला पाहिजे या उद्देशाने जिल्हा अध्यक्षा सौ ज्योतिका हरयाण,तसेच सौ.सुप्रिया पाटील,सौ.नेहा कोळंबकर,सौ.दुर्वा मानकर ,सौ.स्वरदा खांडेकर  यांनी एकत्र येऊन संस्थेचे संस्थापक सन्माननीय संदिप परब यांच्याकडून आश्रमातील उपक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेतली व आश्रमातील शाळकरी मुलींना शैक्षणिक साहित्य, कपडे, आश्रमातील सर्वांना खाऊ वाटप करून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू व आनंद निर्माण केला .

 या कार्यक्रमामुळे महिला उत्कर्ष समिती चे समाजातील सर्व स्तरातून

कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 



Comments

Popular posts from this blog