महिला उत्कर्ष समिती पुणे अध्यक्ष मा. सौ. ज्योती गायकवाड यांनी जागतिक महिला दिनी आरोग्यसेवक महिलांना केले सन्मानित
आवाज कोकणचा / पुणे
८ मार्च / गणेश कांबळे ( प्रतिनिधी )
महिला उत्कर्ष समिती पुणे अध्यक्ष मा. सौ.ज्योती गायकवाड यांनी आरोग्याची अखंड सेवा देणाऱ्या महिला नर्सना केले सन्मानित.
-----------------------------------------------
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष मा. सौ. ज्योती गायकवाड यांनी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल येथे कार्यरत नर्स आणि महिला सफाई कर्मचारी यांना गुलाब पुष्प व समितीचे अभिनंदन प्रमाणपत्र देवून सन्मानित केले.
त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने अनेकांनी बोलताना गायकवाड यांचे आभार मानले व आशीर्वाद दिले.
या महिला नेहमीच आपल्या सेवेद्वारे समाजाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आपले काम करत असतात पण महिला दिनाचे औचित्य साधत त्यांचा झालेला सन्मान ही खूप मोठी बाब ठरली आहे.
यावेळी बोलताना मा. गायकवाड यांनी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे ही समाजसेवेची कामे तसेच महिलांना आर्थिक व सामाजिक सक्षम बनवण्यासाठी तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हटले .
अशा उपक्रमातून समाजाप्रती आपण आपले कर्तव्य पार पाडत असतो असेही त्या म्हणाल्या.
Comments
Post a Comment