महिला उत्कर्ष समिती विदर्भ विभागाने साजरा केला जागतिक महिला दिवस
आवाज कोकणचा / अकोला
८ मार्च / प्रतिनिधी
मूर्तिजापूर मध्ये महिला उत्कर्ष समितीच्या वतीने सौ. सुनीता इंगळे यांनी साजरा केला जागतिक महिला दिन
----------------------------------------------
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला उत्कर्ष समिती विदर्भ विभागीय पदाधिकारी मा. सौ. सुनीता इंगळे यांनी परिसरातील महिलांना एकत्र आणत हळदीकुंकू औक्षण व महिलांना संविधानाने दिलेले अधिकार या विषयावर चर्चा सत्र घडवून आणले व उपस्थित महिलांना आपल्या अधिकारांची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांना प्रत्येकी दोन किलो हरभरा चना वाटप करून हा स्नेह अधिक वृद्धिंगत करण्याचा मानस व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी सौ शितल रावस्वकर, सोनू रावस्ककर, सौ गांवडे, सौ .चव्हाण बाई, सौ .रंजना ढोके, मिना खांडेकर, सौ तायडे, सौ जामनिक, सौ .वाकोडे , सुजता ढोके या उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment