नवी मुंबई उलवे येथे होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
आवाज कोकणचा / नवी मुंबई
८मार्च / अशोक म्हात्रे
-----------------------------------------------
झेप सामाजिक संस्था व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था उलवे तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
-----------------------------------------------
नवी मुंबई उलवे नोड येथे प्रथमच झेप सामाजिक संस्था व स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्था यांच्या मार्फत दि.०८ मार्च २०२२ रोजी कोपर तलावाजवळ जागतीक महिला दिना निमित्त होतकरु मुलांसाठी MPSC ( राज्य लोकसेवा आयोग ) व UPSC ( संघ लोकसेवा आयोग ) ह्या दोन स्पर्धा परिक्षांचे मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले ज्या साठी *प्रा. प्रविण पाटील सर M.A.M.Phil,UGC-SET, LL.B, DLL&LW, MCJ* यांनी मार्गदर्शन केले तर या वेळी सुविधा वेती , भाग्यश्री ताई, अनिल पाटील व गौरव म्हात्रे यांनी देखील आपले मत व्यक्त केले.
चौकट
*गावोगावी जाऊन MPSC / UPSC परीक्षेसाठी मुलांना तयार करुन ४०-५० मुलांच्या ग्रुप ला मोफत मार्गदर्शन करुन लवकरच पनवेल उरण तालुक्यातुन IAS / IPA अधिकारी तयार करण्याचे आश्वासन स्थानिक प्रकल्पग्रस्त संस्थेचे अध्यक्ष गौरव म्हात्रे यांनी दिले.*
Comments
Post a Comment