जाणीव ८६ एस. एस. सी. विद्यार्थी शिक्षक स्नेहमेळावा संपन्न

 आवाज कोकणचा/पेण

७ मार्च / अरुण चवरकर

जाणिव एस एस सी ८६ विद्यार्थी,  विद्यार्थिनी,  शिक्षक,  शिपाई स्नेह बंध सोहळा संपन्न...

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

        पेण  तालुक्यातील गडब जनता हायस्कूल गडब चे  १९८६ बॅच च्या एस. एस. सी. च्या  विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक , संस्कार विद्यालय गडब येथे आयोजित करण्यात आला होता.

 कार्यक्रमाची सुरुवात  निवृत्ती बुवा ठाकूर यांच्या सुमधुर आवाजात स्वागत गीताने झाली. उपस्थित सर्व या गीताने मंत्र मुग्ध होऊन भाराऊन गेले.

 त्याकाळचे शिक्षक कसे होते हे पाहून विद्यार्थी गहिवरले तर तेव्हाचे विद्यार्थी आजचे सुज्ञ नागरिक घडलेत हे पाहून शिक्षकांना अश्रू अनावर झाले कारण ह्या कार्यक्रमासाठी शिक्षक आर टी पाटील,भांदिरगे,कोंडावले,गोखले , प्रदीप धोका , तानाजी पाटील  सी,एन, पाटील, सर्व उपस्थीत  वाई, कोल्हापूर, सातारा, बीड या विभागातून  तसेच अनेक विद्यार्थि  गुजरात, मुंबई, ठाणे,इतर ठिकाणांहून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. 

 ह्या गृपचे अनेक विद्यार्थी विद्यार्थीनीनी  शैक्षणिक, राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रात नाव लौकीक मिळवले आहे.  

अर्थ व बांधकाम समिति  सभापती संजय जांभळे यांनी  मनोगत व्यक्त करताना त्या वेळची भौगोलिक परिस्थिती व आर्थिक परिस्थिती ही वेगळी होती. त्याकाळचे  शिक्षक विद्यार्थी घडावेत म्हणून मारायचे ज्याचे फळ आज समोर आहे. या व इतर अनेक आठवणी त्यांनी व्यक्त केल्या.  मे महिन्यात सर्व गृपचा परीवार दोन दिवस फीरायला नेतो तयार रहा असे आव्हान केले व कार्यक्रमासाठी उपस्थितांची  भोजनाची व्यवस्था त्यांनी केली. 

      संजय मोकल, संजय चवरकर, दिलीप पाटील,छाया पाटील, वंदना म्हात्रे, इंदुमती, अरूण चवरकर यांनी  शाळेय जिवनात घडलेल्या आठवणी सांगितल्या  यानंतर शिक्षकांचे मनोगत व आठवणीअसा सर्व कार्यक्रम भारावून टाकणारा होता.

तर हेमंत पाटील यांनी  निरोप समयी  प्रत्येकाला एक किलो मिठाई स्नेहरूप भेट दिली.

  सर्व मुलींनी प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम व्हायला हवा अशी इच्छा व्यक्त केली . सर्व ग्रुपला एकत्र आणण्यासाठी  दिलीप पाटील, अरूण चवरकर, संतोष चांदोरकर, संजय चवरकर, कमलाकर पाटील, दिगंबर पाटील  यानी परिश्रम केले. 




Comments

Popular posts from this blog