मूर्तिजापूर येथे तिसऱ्या आंबेडकरी काव्य संगीतीचे आयोजन ....

 आवाज कोकणचा / सुनीता इंगळे

७ मार्च / मूर्तिजापूर - अकोला

----------------------------------------------

आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ, निळाई सामाजिक सांस्कृतिक  परीवार ,परिवर्तन धम्म महिला बहू संस्था यांच्या विद्यमाने तिसऱ्या आंबेडकरी काव्य संगीतीचे आयोजन ....

----------------------------------------------


               निळाई परीवाराच्या वतीने आयोजित दि . ६ मार्च २०२२ रोजी पंचशील धम्म टेकडीवर एक दिवसीय काव्य संगीतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रविण कांबळे यांनी केले.  धम्म रॅली ने सुरुवात करून कार्यक्रमाच्या अध्यक्ष     कवयित्री ,कादंबरीकार ,समिक्षक सुनीता इंगळे यांनी विहारात स्वागत केले. 

तथागत बुध्द तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  फोटोला पुप्ष हार अपर्ण केल्यानंतर पंचशिल झेंड्याला सलामी देवून ध्वाजारोहण झाले. 

 प्रा,विजयाताई मुळे यांनी आपल्या  भाषणात म्हटले की आपण नेहमी एस्सी . एस्सी  का म्हणतो आपण बुध्दीस्ट का म्हणत नाही.. बुध्दीस्ट म्हणजे बुध्दीमान म्हणून सर्वांनी एस्सी न म्हणता बुध्दीस्ट म्हणावे. 

 माजी तहसीलदार उषा टोळे यांनी ओघवत्या वऱ्हाडी भाषेत  बोलून सर्वांचे मन चिंब चिंब भिजवले. 

यावेळी सुनिता इंगळे यांनी आपले विचार मांडताना सांगीतले की आंबेडकरी कवी हा समाजाला दिशा दाखवणारा असतो.आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वाणी लोकांच्या पर्यंत नेणारा हा कवी होय.कवीनी नव्या युगाची दाहकता लक्षात घेऊन समाज एक होण्यासाठी कविता रचाव्यात ,कारण समाजाची ही दशा पाहवत नसल्याने कवी कविता करतो पण त्या कवितेत त्याने जीव ओतला पाहिजे.. नव्या दमाचे काव्य त्यांनी केले  पाहीजे..

जात्यावर ज्या बाया दळण दळायच्या , लग्नात हळद दळताना म्हणत असत कापडी मांडव कोण्या शिंप्यांन शिवला, 

सोन्याच्या सूई दोऱ्याने  वर जयभीम लिहला.... अशा आशयाची जात्यावरची ओवी गावून सामाजिक प्रबोधन करत असत..

शेतात बाया जायाच्या तेव्हा ही प्रबोधन करायच्या .

अंबाडीच्या भाजीचे घेईन शेंडे शेंडे

माझ्या भीमरावाचे किती निघाले निळे झेंडे

अश्या आशायाचे अडाणी बाया सुध्दा गाणे रचत असत..खरोखरच स्त्रियांनी भीम चळवळ संभाळली आहे 

तसेच वामनदादा कर्डकांनी समाजाला असंख्य  काव्यांचा ठेवा दिला आहे..

उध्दरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे

होता तो भीम माझा कोहीनुर भारताचा

बुध्दाचा धम्मपद त्याने दाविला तारण्याचा..

तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी..

,म्हणविती भीमाचे चेले जरी हे मेले

यांनीच भीमाचे तुकडे तुकडे केले

असे विविध प्रकारचे वामन दादांनी काव्य रचले आहेत..

बाबा तुझ्या मताचा बाजार लावला रे

सारा समाज आता नेत्यास कावला रे 

 गझलकार सरकाटे यांनी ही समाजावर आपल्या लेखणीतून प्रहार केले आहेत.

कार्यास तुझ्या लाख लाख धन्यवाद बाबा

लेकरं बघ आपसांत घालतात वाद बाबा

एक झालो जर या घडीला तर

कुणीच करणार नाही आमच्या शी वाद बाबा..

रमेश बुरबुरे सर आपल्या लेखणीतून आंबेडकरी जनतेला एकत्र येण्याची  आशा निर्माण करतात  .

यशंवत सर म्हणतात..

रात्रीचा खंजीर उरात खुपसून जागलो

मी विजेच्या प्रवाहात पोहून पाहिले

मरायची खुशी मला कधीच नव्हती 

मी माझ्या श्वासाचे दावे अजमावून पाहिले..

असे कवी लेखक आहेत की त्यांनी आंबेडकरी धुरा संभाळली आहे..

देऊन लेखनीचे हत्यार भीमबाबा

हदयात पेरली तू अंगार भीमबाबा

केलेत शिक्षणाच्या तू या जडीबुटीने

सारेच दूर अमुचे आजार भीमबाबा

प्रकाश दादा बनसोड . म्हणतात लेखणी ही तलवार आहे..

आंबेडकरी गझलकार समाज प्रबोधन करून लेखणीची तलवार करतात..आजचा तरूण वर्ग मोबाईलच्या  अधिपत्याखाली जीवन जगत आहे ते टाळण्यासाठी कवीने नव्या पिढीची जबाबदारी घ्यावी अशा आशयाचे मनोगत करतानाच दोन ओळी म्हणून दाखवल्या..

भीम बाबासारखा मज तारणारा पाहिजे

चळवळीचा रथ खुशीने ओडणारा पाहिजे

आजला ना आसवांना कोण वाली राहीले 

आसवांना न्याय देणारा भांडणारा पाहिजे..

असा नेता आंबेडकरी चळवळीत निर्माण व्हावा अशी आशा सुनीता इंगळे यांनी समाजासमोर ठेवली आहे आंबेडकरी काव्यांच्या माध्यमातून...

आपल्या भाषणातून त्यांनी मिडीयावर लक्ष वेधले आहे.त्या म्हणतात की लोकशाहीचा चौथा स्तंभ मिडीया पण आज पाहतो मिडीया सुध्दा अन्यायाची भाषा बोलू लागला आहे..

मी सावित्री बोलते एक पात्री नाटक झाले. नंतर परी संवाद झाला..या मध्ये सरिता सातारडे  मँडम .शीला मँडम .डाँ.सुनंदा कांबळे मँडम   यांनी भाग घेऊन त्यांनी आपले लक्ष वेधले होते ..सरिता सातारडे म्हणाल्या की तथागताचा इतिहास आहे हा खोटा शिकवल्या जातो.खरा इतिहास समोर येऊ देत नाही.. यावर त्यांनी आपले भाष्य केले

कविसंमेलनाच्या अध्यक्ष 

दिपाली दीप रामटेके ताई होत्या. एकापेक्षा एक कविता सादर करण्यात आल्या...

या मध्ये कवी वर्ग  मोठ्या संख्येने उपस्थित होता.  ,सुरेश वंजारी ,जगदीश राऊत ,सुर्यकांत मुनघाटे ,करूणा मुन जयश्री ताई 

आदी कवीनी भाग घेतला होता.

तळेगाव शा.प.या गावी एक उंच टेकडी आहे .त्या टेकडीवर भव्यदिव्य बौध्द विहार तथा प्रबोधन हॉल व्हावा या साठी ग्रामस्थांनी  प्रंचड कार्य केले आहे तेथे प्रबोधन वर्ग चालावे अशी मागणी ग्रामस्थांची होती. विशेषतः सुरेश तागडे सर हे आपल्या ८०व्या वर्षि सुध्दा जोमाने  धम्मकार्य करतात ,एखाद्या तरूणाला लाजवतील असे त्यांचे व्यक्तीमत्व होते   त्यांची धम्माबद्लची श्रध्दा बघून पाहूने मंडळी भारावून गेले

आदरणीय प्रा.प्रविण कांबळे सरांनी हे आंबेडकरी काव्य संगीतीचा हा कार्यक्रम आयोजित करून तळेगाव शा.प.रहीवाश्यांना गोड पर्वणी दिली .



Comments

Popular posts from this blog