आगरी समाजाची चैत्राली कोपरकर हिने सी. ए. परीक्षेत सुयश मिळवल्या बद्दल पत्रकार उत्कर्ष समिती आणि इंडियन मार्शल आर्ट्स शितो - रियो फेडरेशन तर्फे सन्मानीत

 आवाज कोकणचा / नवी मुंबई

दिनांक : 6 मार्च 22 / प्रतिनिधी

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

नवी मुंबई मधील कळंबोली रोडपाली येथील श्रीमती बारकूबाई एन्. पाटील मराठी व इंग्लिश मीडियम विद्यालय  येथे पेंधर गावातील आगरी समाजाची कुमारी चैत्राली भास्कर कोपरकर हिने चार्टर्ड अकाउंटट  ( CA)  ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण  केल्याबद्दल पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र व इंडियन मार्शल आर्ट्स शितो - रियो फेडरेशन या संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.

         याप्रसंगी समिती प्रदेश अध्यक्ष डॉ. अशोक  लक्ष्मण म्हात्रे, खजिनदार शैलेश सीताराम ठाकूर (आय.एम एस एफ, उपाध्यक्ष ) तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्व विक्रम नावावर असलेले  मा. पंडित तुकाराम  धायगुडे सर यांच्या हस्ते चैत्राली हिस सन्मानीत  करण्यात आले.

      यावेळी मानसी भाबल, श्रेया कटके, अभिषेक सिंग, प्रतीश खताळ, सानिका ठाकुर, भूमीजा पांडे, पियुष धायगुडे, मानसी गोरे, स्मृती तोडकर, ऋतुजा माळी, श्रुती सोनावले, श्रीकृष्णा मौर्या, गोकुळराजा धंदापाणी, कुणाल शेकाडे या सर्वांनी प्रोत्साहित होत टाळ्यांच्या गडगडाटात  तिचे अभिनंदन केले. 

          यावेळी बोलताना चैत्राली हिने शालेय जीवन ते आतापर्यंतचा तिचा प्रवास मांडला व उच्च ध्येय गाठण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

     डॉ. म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत उच्च ध्येय बाळगण्याचे व ते पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत करण्या बरोबरच योग्य मार्गदर्शन घेण्याचे सांगितले व सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तर मा. पंडित धायगुडे सरांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नाव सामील करण्यासाठी केलेल्या मेहनती बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी चैत्राली चे वडील भास्कर कोपरकर, भाऊ स्वराज कोपरकर आवर्जून उपस्थित होते.

या कार्यक्रमास विभागातील वरिष्ठ समाजसेवक व शाळेचे संचालक  मा. आत्माराम नामदेव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



Comments

Popular posts from this blog