महिला उत्कर्ष समितीने राज्यभर उत्सहात साजरा केला जागतिक महिला दिन

 




आवाज कोकणचा / नवी मुंबई
८ मार्च - प्रतिनिधी .
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या वतीने राज्यभर जागतिक महिलादिन उत्साहात संपन्न.
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या वतीने राज्यभरात महिला दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.
उरण येथे झालेल्या कार्यक्रमात
कार्यक्रमाची सुरुवात समितीचे प्रमुख डॉ. अशोक म्हात्रे, मा. कुमारी शुभांगीताई रोकडे, मा. रेखा घरत, मा. निर्मला पाटील, यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.  त्यानंतर समितीच्या  उरण तालुका अध्यक्ष माननीय निर्मला पाटील यांनी ईशस्तवन केले.
वैभववाडी येथे तालुका अध्यक्ष मा. रश्मी रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन केले होते.
      जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रेखा घरत यांनी   हळदीकुंकूचे शानदार आयोजन केले होते.
यावेळी डॉ. म्हात्रे यांनी समितीच्या कर्याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली तसेच खजिनदार शैलेश ठाकूर यांनी समिति मार्फत महिलांना मोफत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे जाहीर केले.
सदस्या निकिता पाटील आणि भारती कांबळे  यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित गाणे सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. 
  *मा. कुमारी शुभांगीताई रोकडे* यांनी  उपस्थितीत महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून विशेष काळजी घ्यायचे आवाहन केले. 
या कार्यक्रमासाठी विभागातील  श्रीमती अफसा मुक्री मॅडम, सौ संध्याताई ठाकुर,  योगसाधनाताई पाटील, आश्रया शिवकरमॅडम, सौ.  रेश्मा पाटील, सौ भावना पाटील, सौ. करिष्मा म्हात्रे, सौ शर्मिला घरत, सौ. उज्वला तांडेल, सौ. दर्शना म्हात्रे, सौ.  अस्मिता गावंड ,सौ दिपाली पाटील, सौ . स्वप्नजा म्हात्रे,  सौ .सचिता वाघवले,  सौ. कोमल ठाकुर, सौ.  मोनीका पाटील, कुमारी अपुर्वा  यांच्यासह इतर  महिला सदस्या उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog