आवाज  कोकणचा  / मुंबई प्रतिनिधी

दिनांक ६ मार्च 22.

...............................................

इलेक्ट्रो होमिओपॅथी संयुक्त समितीची हॉटेल ताज पॅलेस मुंबई येथे बैठक संपन्न

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


इलेक्ट्रो होमिओपॅथी या पाचव्या विकसनशील चिकित्सा पद्धतीस  महाराष्ट्रात मान्यता मिळावी याकरिता कार्य करणाऱ्या इलेक्ट्रोहोमिओपॅथी  संयुक्त  समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची  बैठक मुंबई येथील हॉटेल ताज पॅलेस येथे संपन्न झाली. 

यावेळी इलेक्ट्रो होमिओपॅथी ला शासन स्तरावर राजमान्यता मिळावी याकरिता महाराष्ट्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन शासनास संयुक्त निवेदन देण्यात आले या बैठकीस डॉ.  धर्मेंद्र शहा, डॉ. मनोज कुपरणे, डॉ. अशोक म्हात्रे, डॉ. गजानन पाटील, डॉ. हतीम अली, डॉ.मल्लेश गाजंगी, डॉ सी. एस. यादव, डॉ प्रमोदकुमार सिंह  , उपस्थित होते.

इलेक्ट्रो होमिओपॅथी बाबत शासन सकारात्मक असून लवकरच योग्य तो निर्णय घेऊन या चिकित्सा पद्धतीच्या  व्यवसायिकांना न्याय मिळेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

या संदर्भात बोलताना डॉ.म्हात्रे यांनी लवकरच सर्वांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून त्या संदर्भात गुगल मिट Google MEET च्या माध्यमातून सर्वांसोबत संपर्क साधणार असल्याचे म्हटले.  

          तसेच तळागाळात  इलेक्ट्रो होमिओपॅथी चा व्यवसाय करणाऱ्या बंधू-भगिनींनी स्वतःहून पुढे यावे असे आवाहन केले असून संयुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. 

संपर्कासाठी मोबाईल क्रमांक खालीलप्रमाणे

डॉ. धर्मेंद्र शहा  -  9422008441

डॉ. अशोक म्हात्रे  - 7977996992

डॉ. मनोज कुपरने  -. 9422907625

डॉ गजानन पाटील  -. 9920318870

डॉ. हतिम अली. -. 9769041785










Comments

Popular Posts