कराटे प्रशिक्षक शैलेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे खेळाचे सादरीकरण
आवाज कोकणचा / नवी मुंबई
2 मार्च 22 / प्रतिनिधी
कराटे प्रशिक्षक शैलेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे खेळाचे सादरीकरण
इंडीयन मार्शल आर्ट शितो रियो फेडरेशनचे उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले.
शारदा व एवरेस्ट रिक्षा नाका व चालक मालक कल्याणकारी संस्था कळंबोली यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री सत्यनारायण पूजा आयोजित केली होती. यावेळी प्रशिक्षक प्रवीण पाटील, शैलेश ठाकूर, सुनील पाटील, सानिका ठाकूर, रिताशा सुर्वे, आकांक्षा ठोकळे,ऋतुजा माळी, नयन कवडे, पियुष धायगुडे. कुणाल शेकडे यांच्या सह अनेक विद्यार्थ्यांनी कराटे मधील आपले कौशल्य दाखविले.
रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पाटील, उपाध्यक्ष राना उर्फ महेंद्र पाटील, सचिव भरत साळुंखे, खजिनदार समीर जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेवक बबन मुकादम, नगरसेवक अमर पाटील, भाजपा अध्यक्ष रविनाथ पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या प्रिया मुकादम यांनी उपस्थित राहून श्री सत्यनारायणाचे दर्शन घेतले.
Comments
Post a Comment