नवसाला पावणारी माता कालंबादेवी ची यात्रा उत्साहात संपन्न

 



आवाज कोकणचा / पेण
१६ एप्रिल  / अरुण चवरकर.
..................................................
*नवसाला पावणारी काळंबादेवी ची यात्रा चैत्र पौर्णिमेला संपन्न*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पेण तालुक्यातील गडब येथील जागृत देवस्थान व  नवसाला पावणारी देवी म्हणून जीची महती आहे अशा  श्री काळंबादेवीची  यात्रा चैत्र पौर्णिमेला मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली आहे,
देवीला स्थानिक लोकांसह विभागातील अनेक भाविक भक्त  दान  देत असतात .
यात्रेच्या निमित्ताने गडब गावातील देवीचे भाविक भक्त श्री. हेमंत तुकाराम पाटील व सौ मोहिनी हेमंत पाटील  ह्या दांपत्याने काळंबादेवी ला (सोन्याचा मुखवटा) दान केला आहे .
हेमंत पाटील हे विभागातील प्रतिष्ठित  उद्योजक असुन ते अतीशय गरिबीतून पुढे आलेले आहेत.
श्री माता काळंबादेवी चा आशिर्वादने आपल्याला हे वैभव प्राप्त झाले अशी त्यांची धारणा आहे. 
सौ. मोहिनी व हेमंत पाटील हे दांपत्य  देवीचे एक निष्ठावंत भक्त असून देवी मुलेच सर्व मार्ग मिळालेत अशी त्यांची श्रद्धा आहे व या विभागात दानशूर व्यक्ती म्हणून हेमंत पाटील यांचं नाव आवर्जून घेतलं जाते.  श्री माता काळंबादेवीच्या यात्रेच्या निमित्ताने उभय दांपत्याने सोन्याचा मुकुट देवीच्या चरणी अर्पण केला.
त्यामुळे  सर्व स्तरातून उभयता दोघांचं कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog