पत्रकार उत्कर्ष समिती आयोजित आरोग्य शिबिर संपंन........!!!

 आवाज कोकणचा / उरण 

21प्रिल 22 / प्रतिनिधी.

पत्रकार उत्कर्ष समिती व आधार हॉस्पिटल आयोजित आरोग्य शिबिर संपंन........!!!




    ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

पत्रकार उत्कर्ष समिती  व आधार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विशाल विजय पाटील व कु. तनिष्क वैभव पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त  मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन उरण तालुक्यातील सारडे येथे केले होते.

या शिबिराचे उद्घाटन  ए.डी पाटील सर, विजय पाटील हरिश्‍चंद्र पाटील , डॉ. शुभांगी आवाज कोकणच्या कार्यकारी संपादिका आरती पाटील व प्रगती पाटील यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात केली तसेच सारडे गाव चे माजी उपसरपंच शामकांत पाटील आणि श्रीफळ अर्पून उद्घाटन झाल्याचे घोषित केले.शिबिराचा लाभ सारडे, वशेणी सह आजूबाजू च्या गावातील जनतेने घेतला. या शिबिरासाठी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे, सचिव डॉ वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, यांच्यासह  शामकांत पाटील हरिश्चंद्र पाटील विजय पाटील, सुजित पाटील, शामकांत पाटील,प्रतिश पाटील, आधार हॉस्पिटल च्या डॉक्टर शुभांगी, दीपक भोपी व स्टाफ उपस्थित होते.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog