*जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्थेतर्फे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रायगड मावळा क्रिकेट संघ तृतीय क्रमांकाने विजयी* 

उत्कृष्ट गोलंदाज म्हणून संदीप पाटील यांना गौरविण्यात आले






नवी मुंबई / विजय पाटील


जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्थेतर्फे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जळगाव येथे केले होते. स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ३२ संघांनी सहभाग घेतला होता. रायगड जिल्‍ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या असलेल्‍या रायगड मावळा क्रिकेट संघाने सहभाग घेतला होता. अनुकूल परिस्थितीत मात करून तिसरा क्रमांक मिळवला. सलग पाच विजय संपादित करून उपांत्य फेरीत प्रवेश करून उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण केल्याने तिसऱ्या क्रमांकावर येऊन विजय मिळविला व एक वेगळे स्थान क्रिकेटप्रेमींच्या मनात निर्माण करण्यात रायगड मावळा संघ यशस्वी झाला. रायगड मावळा क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूने उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करून एक वेगळीच चुणूक दाखविली. संघातील प्रत्‍येक खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी करून खारीचा वाटा उचलत संघाला विजय प्राप्त करून दिला.


      रायगड मावळा संघ विरुध्द सांगली सुपर किंग या अटीतटीच्या सामन्यात रायगड मावळा संघातील धडाकेबाज फलंदाज प्रशांत रहाटे यांनी शेवटच्या चार चेंडूत चार षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. अशिष चौरे यांनी उत्कृष्ट फलंदाजी करून विजय मिळवण्यात मोलाची कामगिरी बजावली. रायगड मावळा क्रिकेट संघाने तिसऱ्या क्रमांकावर विजय मिळवल्याने संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देवून जळगाव जिल्‍हा प्रमुख न्यायाधीश श्री. एस. डी. जगमलानी यांनी रायगड मावळा संघाचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog