माध्यमिक विद्यालय शिरढोचे यश 100 % निकाल

 


आवाज कोकणचा / पनवेल

अशोक घरत

18 जुन 22

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


माध्यमिक विद्यालय शिरढोणचा १०० टक्के निकाल.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


    सु. ए. सो. पालीचे, "आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, माध्यमिक विद्यालय शिरढोणचा" मार्च २०२२ च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला आहे.


     पनवेल तालुक्यातील माध्यमिक विद्यालय शिरढोण  या विद्यालयातील मार्च २०२२ मध्ये एस. एस. सी. परीक्षेस प्रविष्ठ झालेले सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे निकालाची उज्ज्वल परंपरा चालू ठेवलेली आहे.


    विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मा. मुख्याध्यपिका सौ. सोनावणे  आर.आर., सर्व शिक्षक-शिक्षिका व शालेय कर्मचारी वर्ग यांनी घेतलेली अफाट मेहनत विचारात घेऊन स्थानिक शालेय कमिटी अध्यक्ष मा. श्री. पांडुरंग मुकादम साहेब, मा. श्री. राम भोईर साहेब, मा. श्री. शाम ठोंबरे, मा. श्री. चंद्रकांत ठोंबरे, मा. श्री. कांचन मुकादम, मा. श्री. धनाजी महाडिक, मा. श्री  रवींद्र मुकादम, मा. श्री. विश्वनाथ भोपी, मा. सौ. साधना वाजेकर, मा. श्री महेश देशमुख, मा. श्री. संतोष जळे, मा. श्री. राम हातमोडे, मा. श्री. सुदाम माळी आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शालेय  मुख्याध्यापिका , शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले आहे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी  हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचेही शब्दसुमनाने  कौतुक केले आहे.


    शालेय निकालाची उज्ज्वल परंपरा अखंडीत तेवत राहावी म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. वसंत ओसवाल साहेब, सचिव मा. श्री. रवी घोसाळकर साहेब, स्थानिक शालेय कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायत शिरढोणचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांच्या कडून शालेय  मुख्याध्यापिका, शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व भ्रमणध्वनी वरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.*





Comments

Popular posts from this blog