आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधि : दिनांक २३ जुन २२
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने पनवेल तालुक्यातील तळोजा एमआयडीसी विभागातील संजय गांधी स्मारक हायस्कूल पाले बुद्रुक - कोलवडी पडघे, या विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या वर्गात 80 टक्के हून जास्त मार्क मिळून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे खजिनदार शैलेश ठाकूर सदस्य ज्ञानेश्वर कोळी संघटक डॉन एन. के के, पनवेल तालुका अध्यक्ष श्री अशोक घरत , सदस्य व शाळेचे माजी विद्यार्थी श्री सुनील भोईर तसेच सदस्य श्री योगेश पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी कोलवडी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डी.डी. कुंभार सर, पर्यवेक्षक श्री. ईश्वर पाटील, शिक्षक भाऊसाहेब कलूसे व रोहिणी सरोदे तसेच शाळेच्या पालक कमिटीचे अध्यक्ष श्री रुपेश उलवेकर यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी विशेष प्रावीण्य मिळवलेल्या कुमारी दिशा रुपेश उलवेकर, साहू रजनिषकुमार अनीलकुमार, कुमारी जळे संचिता सतीश, कुमारी श्रुती लक्ष्मण पाटील यांच्यासह इतर विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
Comments
Post a Comment