पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा

 

पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा 





आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधि

दिनाक. 29 मे 22

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा  शासकीय विश्रामगृह पनवेल येथे पार पडलेल्या सभेत अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली  करण्यात आली.

 यावेळी पनवेल येथील वरिष्ठ पत्रकार व दैनिक वादळवारा चे संपादक माननीय विजय कडू यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे सर्वानुमते  ठरले .

समितीने मागवलेल्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा होऊन  दैनिक संध्याकाळच्या संपादिका मा. रोहिणी खाडिलकर पोतनीस व दैनिक प्राऊड चे संपादक माननीय उमेश गुजराती यांना जाहीर करण्यात आला.

इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पुरस्कार लक्ष्मीकांत घोणसे पाटील शिक्षक पुरस्कार माननीय वंदना निशिकांत ढवळे व संजय जयराम होळकर यांना तसेच समाजसेवेचा पुरस्कार विवेक नारायण मोकल व सौ शशिकला गणपत गुंजाळ तर वैद्यकीय सेवेचा पुरस्कार डॉक्टर मनोज नगर्गोजे यांना घोषित करण्यात आला आहे तसेच पंच ज्योती हा वेगळ्या कार्यक्षेत्रातील 5 भगिनींना दिला जाणारा पुरस्कार माननीय प्रेरणा गावकर शिल्पा सीमा पाटील सलोनी मोरे व प्रमिला पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.

यावेळी समितीचे कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे, उपाध्यक्ष राकेश खराडे, उपाध्यक्ष राम जाधव, सचिव वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, सदस्य ज्ञानेश्वर कोळी, सहसचिव अमोल सांगळे,  रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर पाटील, वरिष्ठ सदस्य गुरुनाथ तिरपनकर, पनवेल तालुका अध्यक्ष अशोक घरत, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कांबळे यांच्यासह अनेक सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते .

Comments

Popular Posts