वटपौर्णिमेला एक तरी झाड लावण्याचे डॉक्टर स्मिता पाटील यांचे आवाहन

आवाज कोकणचा / प्रतिनिधि
नवी मुंबई.
     


उद्या वटपौर्णिमा या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. परंतु सध्या वाढते शहरीकरण, अनेक महिला भगिनी ऑफिस मध्ये किंवा इतर ठिकाणी कामात व्यस्त असतात त्यामुळे वेळेची कमतरता परिणामी पूर्वीच्या सणाचे पावित्र्य कमी होऊन केवळ प्रथा म्हणून जपण्याचा कल वाढतोय. 
त्यासाठी बाजारातून वडाच्या झाडाची फांदी आणून पूजा करण्याची नवीन प्रथा सुरू झाली आहे ज्यामुळे निसर्गाची अपरिमित हानी होण्यास आपण हातभार लावत असतो. 
वृक्ष दिनाचे औचित्य साधत आपण अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करत असतो. जर वटपौर्णिमा हाच दिवस आपण वृक्षदिन म्हणून साजरा कण्याचा विचार करून तो अमलात आणला तर वृक्षारोपण होईल, आणि त्याचा फायदा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी होईल आणि एकूणच मानव जीवन सुखद करण्यासाठी आपला खारीचा वाटा होईल . 
त्यामुळे उद्याचा दिवस *महिला उत्कर्ष समितिच्या* माध्यमातून  *एक तरी झाड लावू या* असा संकल्प करून निसर्गाप्रती आपले  प्रेम व्यक्त  करूया ..iii.
🌳🌳🌳🌳🌳🌳
*डॉ. स्मिता पाटील*
*अध्यक्षा महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र.*
🌳🌳🌳🌳🌳🌳

Comments

Popular posts from this blog