महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील यांच्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद.
आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधि
महिला उत्कर्ष समितीच्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद......
महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील यांनी वटपौर्णिमेच्या पूर्व संध्येला निसर्गात मोठ्या प्रमाणात ऑक्सीजनची लयलूट करणार्या परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी फांद्या तोडून त्याची कत्तल केली जाणाऱ्या वटवृक्ष किंवा इतर कुठलेही झाड लावण्याचे आवाहन केले होते त्यास अनुसरून समितीच्या अनेक सदस्य व पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच वृक्ष दिनाची वाट न पाहता वटपौर्णिमेचा सण वृक्षदिन म्हणून साजरा केला. विशेषतः रायगड अध्यक्षा सौ रेखा घरत, सिंधुदुर्ग अध्यक्षा सौ. ज्योतीका हरयान , कार्याध्यक्षा श्रुती उरणकर , वैभव वाडी तालुका अध्यक्ष रश्मी रावराणे उपाध्यक्ष सुमित्रा साळुंखे स्वाती साळुंखे अक्षता साळुंखे अश्विनी साळुंखे आणि इतर महिला सदस्य यांनी आपल्या सख्यांसह हा सण साजरा केला.
डॉ. स्मिता म्हात्रे यांनी केलेल्या या आवाहनाचे व प्रयक्ष अमलात आलेल्या परिवर्तनाचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .
यावेळी बोलताना डॉ. स्मिता पाटील यांनी केवळ वृक्षारोपण नव्हे तर निसर्गाचा समतोल व पर्यावरण स्वच्छ राहावे यासाठी यापुढेही वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा मानस असल्याचे म्हटले आहे.
Comments
Post a Comment