आवाज कोकणचा / नवी मुंबई
पनवेल प्रतिनिधि २५ जुन २२
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान दीक्षांत समारंभ संपन्न
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पनवेल जवळील शेडुंग येथिल छत्रपति शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीदान दीक्षांत समारंभ १८ जून २०२२ रोजी थाटामाटात पार पडला.
यावेळी डॉ.विजय कोवे अतिरिक्त कुलसचिव हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ विजय कोवे यानी मार्गदर्शन केले.
देश नव्या युगात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला असून पदवीधर झालेली ही नवीन पिढी मोठे योगदान देईल अशी अपेक्षा त्यावेळी त्यांनी व्यक्त केली. संस्थेचे सचिव डॉ केशव बदया ह्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरूवात दीक्षांत मिरवणूकीने झाली.दीक्षांत मिरवणूकीने सभागृहात प्रमुख पाहुणे, संस्थेचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र दुबे,इतर महाविद्यालयाचे प्राचार्य व अधिष्ठातांचे आगमन झाले. विद्यापीठाचा मानदंड घेऊन परीक्षा कक्ष नियंत्रक डॉ. श्वेता उमाळे या मिरवणूकच्या अग्रभागी होत्या. कार्यक्रमाला सेंट विलफ्रेड कॉलेज ऑफ लाॅ चे प्राचार्य डॉ. मृत्युंजय पांडे आर्ट्स साइंस कॉमर्स चे प्राचार्य डॉ. अनिरुद्ध ऋषि आणि फार्मेसी कॉलेज चे प्राचार्य डॉ. दीनानाथ झाड़े उपस्थित होते.सर्व मान्यावरांचे संस्थेचे विभाग प्रमुख सह प्राध्यापक प्रोफेसर मनोज डोंगरे आणि प्रोफेसर श्रेयस पांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. मंच व्यवस्थापन समिति मधे सह प्राध्यापक प्रोफेसर नीता गावडे, प्रोफेसर वंदना राय, प्रोफेसर स्वप्निल भोईर, प्रोफेसर स्वाति मोरे,प्रोफेसर प्रतीक्षा नारगोरकर, प्रोफेसर गजानन कुंभार, प्रोफेसर अनूप मौर्य, प्रोफेसर देवेंद्र गुरु व प्रोफेसर नूतन काले ह्याच्या समवेत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सह प्राध्यापक प्रोफेसर सायली बांधणकर यांनी सूत्रसंचालन केले. सर्व शाखांचे विभाग प्रमुख, प्राचार्य व प्रमुख अतिथि ह्याच्या हस्ते विद्यार्थ्यांना दीक्षांत प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सहयोगी प्राध्यापक डॉ. अंकुश पवार यांनी कार्यक्रमाची सांगता केली. 'पदवीधर होणं ही नव्या आयुष्याची आणि नव्या संधीची सुरुवात आहे ही सुरूवात आम्हाला छत्रपति शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय ने दिली यांचा आम्हाला सर्व विद्यार्थीवर्गाला अभिमान आहे', असे स्थापत्य अभियंत्रिकी चे विद्यार्थी विशाल यशवंतराव यानी मनोगत व्यक्त केले. तसेच संगणक अभियंत्रिकी विद्यार्थिनी शिवानी देवले हीने 'कार्यक्रम उत्तम झाला व आम्हाला पुन्हा जुन्या दिवसांच्या आठवणीत रम्यण्याचे अवचित मिळाल', असे मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे वातावरण भावनिक केले. शिक्षकेतर कर्मचारी ईश्वर सर, प्रवीण सर, रेशमा मैडम, पूर्वा मैडम, छाया मैडम, मोनिका मैडम ह्याचे कार्यक्रमांमधे योगदान होते.
Comments
Post a Comment