आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय शिरढोण च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधि : दिनांक २६ जुन २२. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
▪▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने पनवेल तालुक्यांतील क्रांतिकारकांचे गाव अशी ओळख असलेल्या शिरढोण येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गात 80 टक्के व त्याहून जास्त मार्क मिळून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी टकले प्रेम जनार्दन महाडिक सानिका अनिल टकले वैष्णवी हरिभाऊ भुमकर जानवी अनिल घरत सायली देविदास महाडिक कावेरी अनंत टकले साक्षी रामचंद्र खारके साक्षी संतोष चौधरी सुजल लक्ष्मण भोईर साक्षी अनिल गोपी सोनल प्रवीण लवटे शुभम सुभाष पवार कल्याणी गजानन गोपी प्राची प्रमोद भुमकर श्रद्धा संतोष साहू शुभावती तारकेश्वर गोस्वामी राजनंदिनी राघवेंद्र या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र , लेखणी व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.
पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे खजिनदार शैलेश ठाकूर सदस्य ज्ञानेश्वर कोळी , पनवेल तालुका अध्यक्ष श्री अशोक घरत , सदस्य श्री सुनील भोईर तसेच सदस्य श्री योगेश पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सोनवणे मॅडम श्री मोकळे सर श्री मोकल सर श्री शिंदे सर म्हात्रे मॅडम आणि मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता.
यावेळी विद्यालयातील प्रथम क्रमांकाचा कुमार टकले प्रेम जनार्दन यांनी भविष्यात मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगण्याचे सांगितले
समिती अध्यक्ष डॉ. म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भविष्यातील गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे पुढील शिक्षणाची निवड करावी तसेच व्यावसायीक अभ्यासक्रम निवडावेत याबाबत आपले मत मांडले.
Comments
Post a Comment