श्रीमती बारकू बाई नामदेव पाटील रिसर्च सोसायटीचे प्रयेश मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे विद्यालय रोडपाली येथे गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा



 आवाज कोकणचा / नवी मुंबई

प्रतिनधी: १३ जुन २०२२. 

           ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

 श्रीमती बारकू बाई नामदेव पाटील रिसर्च सोसायटीचे  प्रयेश मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे विद्यालय रोडपाली  येथे गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा .

        ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

श्रीमती बारकुबाई नामदेव पाटील एज्युकेशन अँड रिसर्च सोसायटीचे प्रयेश मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे विद्यालय रोडपाली कळंबोली नवी मुंबई येथे संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग नामदेव पाटील पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. अशोक ल. म्हात्रे, खजिनदार शैलेश ठाकूर, सदस्य ज्ञानेश्र्वर कोळी, तालुका सदस्य सुनील भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत  मुख्याध्यापिका सौ. सारिका शिवराज पवार व जयश्री सरोदे  यांनी विद्यार्थ्यांसाठी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले होते. 

 या कार्यक्रमात शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा या उत्सवा विषयी सखोल माहिती दिली आणि त्याचे महत्व सांगितले. 

यावेळी इयत्ता दहावी व बारावी मध्ये प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्याना पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने मेवरा हिमांशू नथुराम, लांबा आर्यन अनिल,  सय्यद मोहम्मद यासिर,  शेख योंतोशो सोहिद्दोसिन, खान फिजो अब्दुलहसिज, निकिता नवनाथ जायभाय, मानसी संदीप पवार या विद्यार्थ्याना  प्रशस्तीपत्र व पेन देऊन गौरव करण्यात आला.  

समिति अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत भविष्यातील आव्हाने व अभ्यासक्रम निवड या विषयी मार्गदर्शन करून अभिनंदन केले. 

या कार्यक्रमासाठी  शिक्षक वृंद संध्या संहानी, उषा चाळके, कुसुम चौरसिया, शितलकुमार शिंदे, साहेबराव गव्हाणे, आरती लाल, सुनिता चौघुळे, पल्लवी आहेर, मेहजबीन सय्यद, वैशाली मोहिते, सुषमा रेवगडे, शोभा ताटे, रेश्मा वनवे, सीमा लावंड, अश्विनी खोडे, तेजश्री पवार, प्रज्ञा भोसले, स्वाती ढेंबरे, अर्चना हांडे, व इतर स्टाफ यांनी मोलाची साथ दिली. 




Comments

Popular posts from this blog