पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 


आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधी :

१७ जुलै २०२२

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

 पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

पनवेल तालुक्यातील तळोजा एमआयडीसी येथील पडघे गावाजवळून वाहणाऱ्या कासाडी नदीपात्रा शेजारी पत्रकार उत्कर्ष समिती पनवेल तालुका सदस्य श्री सुनील भोईर व पर्यावरण प्रेमी योगेश पगडे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक ल. म्हात्रे,  सचिव डॉ.  वैभव पाटील , खजिनदार श्री शैलेश ठाकूर , तालुका सदस्य व साप्ताहिक सत्याची वाटचाल चे संपादक श्री गोविंद जोशी, रायगड जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष श्री हेमराज म्हात्रे,  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अध्यक्ष श्री . जीवन गायकवाड , उपसरपंच श्री यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी पाम, कडुनिंब, पिंपळ, वड यासारख्या वातावरणात अधिक प्रमाणात प्राणवायू सोडणाऱ्या पन्नासहून अधिक  वृक्षांची लागवड करण्यात आली.

यागोदरही  वटपौर्णमेच्या दिवशी  पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या महिला सदस्य व पदाधिकाऱ्यांनी महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ स्मिता पाटील यांनी आवाहन केल्यानंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करून एक आगळावेगळा पायंडा मांडून महिलांना अधिकाधिक वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन केले होते व त्यावेळी सिंधुदुर्ग , रायगड , नवी मुंबई, रत्नागिरी, पुणे, अकोला येथे तेथील सदस्य व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर  वृक्षारोपण केले होते. 








Comments

Popular Posts