छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधि : दिनांक २६ जुन २२. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
▪▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने पनवेल तालुक्यांतील पळस्पे येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयातिल इयत्ता १० वी मध्ये ८०% व त्याहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे , सचिव डॉ वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, सदस्य ज्ञानेश्वर कोळी , पनवेल तालुका अध्यक्ष श्री अशोक घरत , सदस्य श्री सुनील भोईर तसेच सदस्य श्री योगेश पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बुटेपवाड अनिकेत मारुती , कुमारी जाधव गीता गोरख, कुमारी मालुसरे तेजस्विनी संजय , कुमारी ठोंबरे श्रुती दिलीप, कुमारी पाटील रितू रोहिदास , कुमारी मोरे दिपाली आनंद, कुमारी कटेकर निहारिका भरत आणि कुमारी राठोड सुजाता सुनील या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र , लेखणी व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.
या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस साळुंखे पर्यवेक्षक श्री जी बी पाटील शिक्षिका सौ के एम मालुसरे सौ लता जाधव श्री घनश्याम पाटील सर स्नेहल भोसले सर सोनाली गवांदे श्रीमती नम्रता कल्याणकर शाळा कमिटीचे चेअरमन श्री रवीशेठ चोरगे श्रीमती दमयंती भगत आणि पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
समिती अध्यक्ष डॉ. म्हात्रे यांनी तसेच तालुका अध्यक्ष अशोक घरत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोठे लक्ष्य ठेवून अभ्यास करण्याचे तसेच आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्याचे आव्हान केले.
Comments
Post a Comment