खानावळे कातकरवाडी येथे पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

आवाज कोकणचा /  पनवेल 

प्रतिनिधी 30 जून 2022

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रच्या माध्यमातून  खानावळे कातकरवाडी येथील आदिवासी शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना समितीचे पनवेल तालुका अध्यक्ष माननीय अशोक घरत यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. 

    शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शाफिया शेख यांनी  समितीच्या माध्यमातून डोंगर कपारीत राहणाऱ्या या बालकांसाठी असे  कार्यक्राम वारंवार राबवण्याची गरज असल्याचे  म्हटले. 

समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी सौ. शेख यांच्या या  मागणीला दुजोरा देत अधून मधून शाळेला भेट देऊन तेथील बालकांसाठी आवश्यक बाबीं बाबत चर्चा करून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

या कार्यक्रमासाठी समितीचे पनवेल तालुका अध्यक्ष श्री अशोक घरत यांचा सिंहाचा वाटा होता तसेच यावेळी खजिनदार शैलेश ठाकूर, प्रदेश सदस्य ज्ञानेश्वर कोळी, पनवेल सदस्य सुनिल भोईर,  सरपंच माननीय जयश्री नाईक,  सदस्य श्री गणेश कातकरी व शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या. 

यावेळी बोलताना  अध्यक्ष डॉ. म्हात्रे यांनी ही मुले भविष्यात मोठ्या पदावर जाऊन सामाजिक दुरी दूर करण्यात व आपल्या जात बंधूंना शिक्षित करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  मैलाचा दगड ठरतील असे म्हटले.



Comments

Popular posts from this blog