सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूल कोनच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

आवाज कोकणचा / नवी मुंबई

प्रतिनिधि : दिनांक २६ जुन २२. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

▪▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️      

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने पनवेल तालुक्यांतील कोन  येथील राममूर्ती एज्युकेशन सोसायटीचे सेंट झेवियर्स इंग्लिश हायस्कूलच्या  १० वी व १२ वी मध्ये ८०% व त्याहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे , सचिव डॉ वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, सदस्य ज्ञानेश्वर कोळी , पनवेल तालुका अध्यक्ष श्री अशोक घरत , सदस्य  श्री सुनील भोईर तसेच सदस्य श्री योगेश पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी पाटील श्रुती मच्छिंद्र , गायकर हितेश सुनील,  भोईर शुभम शशिकांत , हर्षाली धनाजी पाटील,  पुजारी प्रणिता जयकर , पाटील विनय अविनाश,  पाटील साक्षी चारुदत्त,  म्हात्रे साक्षी शशिकांत,  लगड ऋतुजा संदीप,  म्हात्रे स्नेहा नितीन,  शिनोलीकर ओमकार संदीप , भोईर रोशनी कमलाकर , जोगदंड अभिषेक राजकिरण , दळवी मंथन नरेश , सिंग ज्योती शिवमंगल,  धुळे अक्षरा अनंत , घोडके देविदास सुरेश,  कोतवाल सकीना नबी,  माहेश्वरी नंदिनी जयंती,  पुजारी पूर्वी वासुदेव,  निकम आकांक्षा अशोक या  विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र , लेखणी व पुष्पगुच्छ तसेच विद्यालयातर्फ  आकर्षक भेटवस्तू देवून गौरविण्यात  आले.

     या वेळी विद्यालयाचे  मुख्याध्यापिका सौ पद्मावती श्री व्ही एस म्हात्रे शाळेचे सर्व विभाग प्रमुख पालक प्रतिनिधी श्री संजय बाळाराम म्हात्रे गावचे सरपंच दीपक म्हात्रे माजी सरपंच अशोक म्हात्रे माजी उपसरपंच जितेश शिसवे आणि पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

समिती अध्यक्ष डॉ. म्हात्रे यांनी तसेच तालुका अध्यक्ष अशोक घरत यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोठे लक्ष्य ठेवून अभ्यास करण्याचे तसेच आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्याचे आव्हान केले. तसेच भविष्याचा विचार करता व्यावसायीक अभ्यासक्रम निवडावेत याबाबत आपले मत मांडले.










 




















Comments

Popular posts from this blog