महिला उत्कर्ष समिती ने पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन सण....
आवाज कोकणचा / प्रतिनिधि
सिंधुदुर्ग ११ ऑगस्ट २२
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
महिला उत्कर्ष समिती ने पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन सण....
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष सौ. ज्योतीका हरियाणा यांच्यासह सुप्रिया पाटील , दुर्वा मानकर, नेहा कोळंबकर व इतर महिला भगिनींनी कणकवली येथे पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला .
रक्षाबंधन या सणाचे महत्त्वच हे आहे की बहीण आपल्या भावाला राखी बांधून सुरक्षेचे कवच मागून घेत असते. पोलीस बांधव हे अहोरात्र देशसेवेचे व्रत अंगीकारत समाजात शांतता सुरक्षितता नांदावी यासाठी अहोरात्र झटत असतात .
आज रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून कणकवली येथील या बहिणींनी आपल्या विभागातील पोलीस बांधवांना राखी बांधून पुन्हा एकदा सामाजिक सुरक्षेची हमी घेतली.
Comments
Post a Comment