पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा....


 आवाज कोकणचा / प्रतिनिधि


गुहागर ११ ऑगस्ट २२

▪▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

महिला उत्कर्ष समिती गुहागर तर्फे  पोलीस बांधवांना राखी बांधून  रक्षाबंधन सण उत्साहात साजरा....


गुहागर तालुका महिला उत्कर्ष समिती अध्यक्षा सौ सुरभी भोसले व रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षा सौ. दीप्ती साळवी यांनी रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधत आपल्या सहकाऱ्यांसह  "सद्रक्षणाय खलनिग्रणाहणाय"  ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या गुहागर तालुक्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तुषार पाचपुते यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना राखी बांधून सुरक्षेची हमी मागून घेतली. 

 पोलीस उपनिरीक्षक श्री जे. पी .कांबळे,  पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री एच. आर. नलावडे , हेडकॉन्स्टेबल श्री आर .एस. धनावडे पोलीस नाईक श्री व्ही. एस. ओहळ,  पोलीस कॉन्स्टेबल श्री. एस. ए. मयेकर,  जमादार घोसाळकर , पोलीस शिपाई श्री वैभव चौगुले व श्री विशाल वायांगनकर,  पोलीस नाईक,  श्री उदय मोणये यांना राखी बांधण्यात आली. 

रक्षाबंधन या सणाचे महत्त्वच हे आहे की बहीण आपल्या भावाला राखी बांधून सुरक्षेचे कवच मागून घेत असते.  पोलीस बांधव हे अहोरात्र देशसेवेचे व्रत अंगीकारत  समाजात शांतता सुरक्षितता नांदावी यासाठी अहोरात्र झटत असतात .

यावेळी समितिच्या सौ.विना काष्टे , सौ. सुवर्णा पागडे, सौ. अनुपमा पोरे, सौ.  मानसी देवकर  व सौ. वर्षा संसारे या भगिनी उपस्थित होत्या. 





Comments

Popular posts from this blog