द वीक मासिक नामावलीत सेंट विल्फ्रेड कॉलेज चौथ्या क्रमांकावर

 


आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतीनिधी : अशोक म्हात्रे
25 ऑगस्ट 22

*' सेंट विल्फ्रेड कॉलेज द वीक ' मासिक नामावलीत सीएसएमआईटी चौथ्या क्रमांकावर*-
'द वीक' मासिकाव्दारे विविध श्रेंणींमधील महाविद्यालयांचे रॅंकींग घोषीत करण्यात येते. यामध्ये एकूणच विद्यापीठे, व्यवस्थापन, महाविद्यालये, फार्मसी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, एआरआयआयए कायदा आणि संशोधन संस्थांचा समावेश आहे. या रँकिंगमध्ये भारतीय शैक्षणिक संस्था 2022 चे सर्वोत्कृष्ट कॉलेज रँकिंग जारी केले, त्यामध्ये सेंट विल्फ्रेड ग्रुप ऑफ कॉलेजेस ने, देशभरातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांपैकी, राष्ट्रीय क्रमवारीत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे असे संस्थेचे  मानद सचिव डॉ.केशव बडाया यांनी सांगितले.
यावेळी सीएसएमआईटी महाविद्यालय हे मुंबईत चौथ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्रात अठरावा   क्रमांकावर आहे. यावेळी संस्थेचे सचिव यांनी  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग  यांचे अभिनंदन केले. विद्यापीठाला काही  उच्च-प्रभाव शाश्वत उद्दिष्टांमध्ये स्थान देण्यात आले-दर्जेदार शिक्षण ,अध्यापनाची गुणवत्ता, पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांची टक्केवारी, आयुष्यभर शिकण्याचे उपाय आणि विद्यार्थ्यांची नियुक्ती प्लैस्मन्ट.विद्यापीठाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे आणि पदवीधर विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार करून कॅम्पस प्लेसमेंट देणे यावर जास्त भर देण्यात आला आहे. सीएसएमआईटी चे विद्यार्थी देश व परदेशात विविध स्तरावर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

Comments

Popular posts from this blog