पत्रकार उत्कर्ष समितीच्या आरती संग्रहाचे प्रकाशन
आवाज कोकणचा / नवी मुंबई
बातमीदार (अशोक घरत)
दिनांक ३० ऑगस्ट २०२२
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पत्रकार उत्कर्ष समितीच्या आरती संग्रहाचे लोकनेते मा. खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन .
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
गणेशोत्सव म्हणजे सर्व विद्या कलांसाठी वयाची कोणतीही अट नसलेले सर्वांना प्रवेश देणारे मुक्त विद्यापीठ.
आजपासून राज्यात आणि जगभरात हा उत्सव दहा दिवस मोठ्या धुमधडाक्यात सुरू राहणार आहे.
पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे तयार करण्यात आलेल्या "देवा श्री गणेशा" या आरती संग्रह पुस्तकाचे प्रकाशन पनवेलचे दानशूर व्यक्तिमत्व असलेले आणि सर्वांचे लाडके माजी खासदार आदरणीय श्री.रामशेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्या राहत्या घरी झाले.
या प्रसंगी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष श्री.डॉ.अशोक लक्ष्मण म्हात्रे , उपाध्यक्ष श्री.रामभाऊ डी.जाधव ,सचिव श्री.डॉ.वैभव विजय पाटील, खजिनदार श्री.शैलेश सिताराम ठाकूर , पनवेल तालुका अध्यक्ष श्री.अशोक नामदेव घरत, रायगड जिल्हा सदस्य श्री.सुनील भोईर, पनवेल तालुका सदस्य श्री.योगेश पगडे आणि साप्ताहिक रायगड दर्पणचे मालक व समितीचे संघटक श्री.डॉन एन.के.के.तसेच पुणे समिती सदस्य श्री.प्रभाकर खरात व श्री.नाना शिंदे आदी पत्रकार सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. रामशेठ ठाकूर यांनी समितीच्या कार्याचे गुणगौरव केले व पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment