कळंबोली येथे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन



आवाज कोकणचा / नवी मुंबई

प्रतिनिधी :

दिनांक २ सप्टेंबर २०२२

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

कळंबोली येथे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन....

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

      दिनांक ३१ ऑगस्ट रोजी वेरोना को. ॲाप हा. सो. सेक्टर १० इ रोडपाली चे यंदाचे गणेशोत्सवाचे ५ वे वर्ष. मागचे २ वर्ष कोविड महामारिमुळे गणेशोत्सव जल्लोषात साजरा करायला भेटला नाहि, मात्र ह्यावर्षी सोसायटीच्या महिलांनी विविध कार्यक्रम राबवण्याचे ठरवुन उत्सवात जोश निर्माण केला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन सोसायटीच्या महिलांनी मंगळागौर व विविध पारंपरिक न्रुत्यांचे आयोजन केले होते. 

           ग्रामीण भागांत प्रसिद्ध असणाऱ्या मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन प कळंबोली मध्ये करण्यात आले तसेच बाल कलाकारांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. खुप जल्लोषात ह्यावर्षीचा गणेशोत्सव साजरा होत आहे. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्री शक्ती फौंडेशन च्या अध्यक्ष सौ विजया कदम यांनी उपस्थिती लावली असे वेरणा सोसायटीचे सेक्रेटरी रोहन गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी बक्षीस वितरण ही विजया कदम यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक गोंधळी यांनी केले सदर कार्यक्रम सोसायटी कमिटीच्या सदस्यांच्या तसेच सोसायटीच्या महिलांच्या यांच्या सहकार्याने पार पडला व त्यातील महिलांपैकी सौ विभा गायकवाड व आर्या कदम यांनी मंगळागौर बद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले



Comments

Popular posts from this blog