गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे क्षयरुग्णांना पोषक आहार व सकस आहार किटचे वाटप

     

                                                

  दि.27 सप्टेंबर 2022

गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 20 क्षयरुग्णांना पोषक आहार व सकस आहार किटचे वाटप

     अलिबाग,दि.27 (जिमाका):- पनवेल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, गव्हाण येथील 20 क्षयरुग्णांना तीन महिन्याचे पोषक आहार व सकस आहार किटचे वाटप निक्षय मित्र डॉ.जेम्स डिसिल्वा यांच्या हस्ते दि.25 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आले.
     यावेळी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करताना निक्षय मित्र डॉ.जेम्स डिसिल्वा यांनी सांगितले की, व्यवस्थित जेवण करून औषधोपचाराच्या गोळ्या खाल्या तर तुम्ही नक्कीच ठणठणीत बरे व्हाल, तुमच्या आरोग्यात लवकर सुधारणा होईल. जेवणात जास्तीत जास्त पालेभाज्या, अंडी, मासे यांचा समावेश केल्यास शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यासाठी या गोळ्या कधीही कमी जेवण करून किंवा उपाशी पोटी घेवू नयेत. तसेच उपचार सुरू असताना मध्येच बरे वाटते म्हणून गोळ्या बंदही करू नयेत.
     प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानात सर्व सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्र, लायन्स व रोटरी क्लबचे प्रतिनिधी, रेडक्रॉसचे प्रतिनिधी व इतर दानशूर व्यक्तींनी सहभाग घेऊन त्यांनी क्षयरुग्णांना दत्तक घ्यावे व त्यांना पोषक आहार व सकस आहार किटचे वाटप करावे. यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ.जेम्स डिसिल्वा यांनी शेवटी केले.
     यावेळी जिल्हा पीपीएम समन्वयक श्री.सतीश दंतराव व श्री.रतिष पाटील (STS) यांनी क्षयरुग्णांनी घ्यावयाचा पोषक आहार तसेच औषधोपचार याविषयी मार्गदर्शन केले. सकस आहार व वेळेवर औषधोपचार यामुळे तुमचे आरोग्य उत्तम व निरोगी होऊ शकते व तुम्ही क्षयरोग मुक्त होऊ शकता, असे त्यांनी सांगितले.
     शेवटी श्री.दिपक धुमाळ (STLS) यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

00000

Comments

Popular posts from this blog